Ramesh Bornare Mahavitaran Controversy: वायरमनवरून सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली! शिवसेना आमदार अन् भाजपच्या बड्या नेत्यामध्ये भर बैठकीतच हायव्होल्टेज ड्रामा!

Mahavitaran Meeting News : वैजापूर तालुक्यातील महावितरणमधील एका वायरमनवर भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यातून त्याने ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचे प्रकरण महावितरणच्या बैठकीत शुक्रवारी चांगलेच गाजले.
Zp meeting
Zp Meeting sarkarnama
Published on
Updated on

Shivsena-BJP Politics : शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या वैजापूर तालुक्यातील महावितरणमधील एका वायरमनवर भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यातून त्याने ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचे प्रकरण महावितरणच्या बैठकीत शुक्रवारी चांगलेच गाजले. खासदार संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आमदार बोरनारे हे वायरमनच्या बचावासाठी पुढे सरसावले.

यावर भाजपचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी आक्षेप घेत चुकीच्या गोष्टीसाठी पुढे कसे येता? वायरमनवर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका घेतली. बोरनारे-गलांडे हे दोघे एकाच तालुक्यातील नेते आहेत. कधी काळी एकाच पक्षात असलेले हे दोघे आता वेगवेगळ्या पक्षात आहेत. पण या दोघांमधील राजकीय संघर्ष या ना त्या निमित्ताने उफाळून येत असतो. त्याचा प्रत्यय शुक्रवारी महावितरणच्या बैठकीत आला.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चौकशी सुरू असलेल्या वायरमनच्या प्रकरणावरून महावितरणची बैठक चांगलीच गाजली. संबंधित वायरमनविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी लावून धरली. मात्र, आमदार बोरनारे यांनी वायरमनची बाजू मांडत चौकशी आणि पुराव्यांनंतरच कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका घेतल्याने गलांडे आणि बोरनारे यांच्यात बैठकीतच जोरदार शाब्दिक चकमक उडाली.

बैठकीत गलांडे यांनी प्रशासनाला थेट सवाल केला की, कारवाई कधी करणार, हे स्पष्ट सांगा. कारवाई होणार आहे की नाही? दोन महिन्यांपूर्वी हा विषय बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतरही कारवाई रखडल्याचा आरोप करत गलांडे यांनी अधिकार्‍यांवर नाराजी व्यक्त केली.

Zp meeting
Maharashtra Politics Live Update: 'चोरलेलं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंकडे राहू नये...': आदित्य ठाकरे

यावेळी आमदार बोरनारे यांनी संबंधित प्रकरणात एकतर्फी निर्णय घेऊ नये, संबंधित व्यक्तीची बाजूही ऐकून घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडली. यावरून दोन्ही बाजूंनी वाद वाढत गेला. बैठकीत काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आमचे मुद्दे खोडून काढले जात आहेत. ही काय पद्धत आहे? कारवाई करायची असेल तर कधी करणार, ते सांगा, अशा शब्दांत गलांडे यांनी संताप व्यक्त केला.

जिल्हा परिषद अध्यक्ष गलांडे यांची बाजू घेत वायरमनने स्वतःच्या अकाऊंटवर ऑनलाईन पैसे घेतले असतील तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मांडली. स्वतःच्या अकाऊंटवर पैसे घेण्याचा वायरमनला कुठलाही अधिकार नाही, असे ते म्हणाले. खासदार संदीपान भुमरे यांची मात्र यावेळी कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. आता प्रशासन संबंधित वायरमनवर नेमकी कधी आणि कोणती कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Zp meeting
Shivsena Politics : उद्धव ठाकरेंनी बैठक बोलवली, आमदारही फुटणार? शिंदेंच्या मंत्र्याचे सूचक विधान, 'येणारे...'

कारवाईच होणार नसेल, तर सभा उधळून लावावी, असा आक्रमक पवित्राही त्यांनी घेतला. भ्रष्टाचाराचे आरोप गंभीर असताना कारवाईला विलंब का होत आहे?, असा प्रश्न उपस्थित करत गलांडे यांनी प्रशासनाकडून ठोस कालमर्यादा मागितली. केवळ चौकशी सुरू असल्याचे सांगून वेळकाढूपणा स्वीकारला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. वाद वाढत असल्याचे पाहून बैठकीतील इतर आमदार आणि मंत्री यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून नियमांनुसार चौकशी पूर्ण करून योग्य कारवाई करण्यावर भर देण्यात आला. या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्हा परिषद बैठकीत भ्रष्टाचाराच्या आरोपांचा मुद्दा केंद्रस्थानी आला. वायरमनवरील आरोप, चौकशीचा विलंब आणि कारवाईच्या मागणीवरून सत्ताधारी व लोकप्रतिनिधींमध्येच मतभेद उघड झाले.

Zp meeting
BJP Clash: पालकमंत्री पंकजा मुंडेंनी जिल्हाधिकाऱ्यांची बाजू घेतली, कुचेंनी वाद घालताच बैठक अर्धवट सोडून बीडला रवाना

मंत्री अतुल सावे यांनीही जिल्हा परिषद अध्यक्ष गलांडे यांची बाजू घेत वायरमनने स्वतःच्या अकाऊंटवर ऑनलाईन पैसे घेतले असतील तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मांडली. स्वतःच्या अकाऊंटवर पैसे घेण्याचा वायरमनला कुठलाही अधिकार नाही, असे ते म्हणाले. खासदार संदीपान भुमरे यांची मात्र यावेळी कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. आता प्रशासन संबंधित वायरमनवर नेमकी कधी आणि कोणती कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com