Sanjay Raut press conference on Shinde group : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत विविध राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचं संकेतही यावेळी त्यांनी दिले. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला थेट अमित शहा यांची टेस्ट ट्युब बेबी असे संबोधत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली.
संजय राऊत म्हणाले, येत्या एक-दोन दिवसांत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आघाडीची अधिकृत घोषणा होऊ शकते. जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून आता फक्त शेवटचा निर्णय बाकी आहे. आमच्यात कोणताही मतभेद नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेकदा एकत्र आले आहेत, एकमेकांच्या घरी गेले आहेत आणि चर्चा देखील झाल्या आहेत. यापेक्षा वेगळं एकत्र येणं काय असतं, असा सवालही त्यांनी केला.
राऊतांनी स्पष्ट केलं की, मुंबईत शिवसेना आणि मनसे हे दोन प्रमुख पक्ष असून ही आघाडी सत्ताधाऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरेल. शरद पवार यांच्यासोबतही चर्चा सुरू असून लवकरच त्यांची भेट होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शक्तीप्रदर्शन होईल का, यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, त्याची फारशी गरज नाही. मात्र पहिला मेळावा झाला तर मराठी माणसांची गर्दी उसळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवाजी पार्क येथील सभेच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका अधिक तीव्र केली. शिंदेंचा शिवतीर्थाशी काय संबंध आहे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी म्हटलं की, अमित शहांनी पक्ष ताब्यात दिला म्हणजे तो तुमचा होत नाही. निवडणूक आयोगाच्या मदतीनं तयार झालेला हा पक्ष आहे, अशी टीका त्यांनी केली.
भाजप आणि शिंदे गटाच्या जागावाटपावर बोलताना राऊत म्हणाले की, ते अजून टप्प्याटप्प्याने खेळ खेळत आहेत. त्यांना त्या टप्प्यातच राहू द्या, असा टोला त्यांनी लगावला. शिवसेना आणि मनसेच्या मागण्या नैतिकदृष्ट्या योग्य असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.