Sanjay Raut, Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena News : संजय राऊतांच्या विरोधात 'या' कारणामुळे शिवसेना शिंदे गटाची पोलिसांत तक्रार

Political News : शिंदे सेनेच्यावतीने एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर केल्याने संजय राऊत यांच्या विरोधात नागपूर पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या घराची काही अज्ञातांनी रेकी केल्याने राज्याचे वातावरण तापले आहे. आदित्य ठाकरे यांनी तत्काळ याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दुसरीकडे शिंदे सेनेच्यावतीने एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर केल्याने संजय राऊत यांच्या विरोधात नागपूर पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन भाजप (Bjp) महायुतीत सहभागी झाले होते. तेव्हापासून संजय राऊत शिंदे यांच्यावर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शिंदे आमदार घेऊन बाहेर पडल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यामुळे ते रोज सकाळी शिवसेना आणि शिंदे यांच्यावर टीका करतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टार्गेट करतात. वेगवेगळी विशेषणे लावून त्यांचा उल्लेख करतात. कधी गद्दार तर कधी खोकेबाज, असे त्यांना संबोधत असतात.

अलीकडेच राऊत यांनी शिंदे यांना नामर्द असे म्हटले आहे. त्यामुळे शिंदे यांचे कार्यकर्ते व समर्थक चांगलेच संतापले आहेत. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचा अपमान केला, ‘नामर्द' अशा गैरसंविधानिक शब्दाचा उपयोग केला. यामुळे भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी असे निवेदन शिवसेनेच्यावतीने नागपूरच्या तहसील पोलिस ठाण्याला देण्यात आले आहे.

नागपूरचे शिवसेना शहर प्रमुख धीरज फंदी यांच्या नेतृत्वात, सहसंपर्क प्रमुख गुलामभाई पोठीयावाला, उप जिल्हाप्रमुख गणेश डोईफोडे, शिवसेना शहर संघटक प्रमुख नरेश मोहाडीकर, युवासेना विधानसभा संघटक साहील जैन, उपविभाग प्रमुख लेखराज पराते, नंदू मरोडे, जावेद खान, राजेश पराते, रिजवान मेमन, हरिश नंदनवार, फरहान कच्ची आदींनी तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT