Uddhav Thackeray Ekanth Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Supreme Court Shiv Sena case : शिवसेना पक्ष व चिन्हावरील सुनावणी संपली; दुसऱ्या दिवशी बाजू मांडल्यानंतर शिंदेंच्या वकिलांनी कोर्टातच दिली महत्त्वाची अपडेट

Eknath Shinde Shiv Sena arguments News : गेल्या आठवडाभरापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नीरज कौल युक्तिवाद करीत आहेत. निवडणूक आयोग कोणत्याही पक्षाची मान्यता रद्द करू शकत नाही. एकनाथ शिंदेंची मुख्य नेता म्हणून केलेली निवड चुकीची नव्हती, असा मोठा युक्तीवाद काैल यांनी केला.

Sachin Waghmare

Mumbai news : सुप्रीम कोर्टात गेल्या महिनाभरापासून शिवसेना पक्ष व चिन्हावर सुनावणी सुरु आहे. सुरुवातीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जोरदार युक्तिवाद ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी करीत बाजू मांडली. त्यानंतर गेल्या आठवडाभरापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नीरज कौल युक्तिवाद करीत आहेत. निवडणूक आयोग कोणत्याही पक्षाची मान्यता रद्द करू शकत नाही. एकनाथ शिंदेंची मुख्य नेता म्हणून केलेली निवड चुकीची नव्हती, असा मोठा युक्तीवाद काैल यांनी केला. त्यासोबतच बुधवारची सुनावणी संपली असून आता गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कोण युक्तिवाद करणार याचे नावही सांगितले.

निवडणूक आयोग कोणत्याही पक्षाची मान्यता रद्द करू शकत नाही. शिंदेंची मुख्य नेता म्हणून केलेली निवड चुकीची नव्हती, असा युक्तीवाद यावेळी काैल यांनी केला. चिन्हाचा निकाल देताना विधीमंडळातील संख्या महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोग ही महत्वाची संस्था असून विधीमंडळात पक्ष महत्वाचा असल्याचेही काैल यांनी म्हटले.

ठाकरेंकडून पक्षाला वैयक्तीक संघटनेसारखा वापर करण्यात आला. पक्षात लोकशाही कुठे आहे? असाही सवाल काैल यांनी उपस्थित केला. पक्षातील अंतर्गत लोकशाहीचा विषय महत्वाचा महत्वाचा आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काैल यांनी केला.

बुधवारच्या सुनावणीवेळी नीरज कौल यांनी मोठे आरोप करताना एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर बुधवारची सुनावणी संपली आहे. आता गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नीरज कौल हेच युंक्तिवाद युक्तिवाद करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT