

New dehli News : सुप्रीम कोर्टात गेल्या पंधरा दिवसापासून शिवसेना पक्ष व चिन्ह कोणाचे यावरून सुनावणी सुरु आहे. सुरुवातीला सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कोर्टात युक्तिवाद करण्यात आला. यावेळी ठाकरेंची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वकील नीरज किशन कौल यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बाजू मांडली आहे.
पक्षात एकाधिकारशाही सुरू होती, कोणाला आवाज उठवता येत नव्हता, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली असा दावा केला आहे. बुधवारी शिंदेंच्या वकिलांनी बाजू मांडल्यानंतर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 सप्टेंबरला कोर्टात होणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांचे वकील युक्तिवाद करणार आहेत.
सुप्रीम कोर्टात बुधवारी एकनाथ शिंदे यांच्या वकिलाने बाजू लावून धरली. यावेळी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेची बाजू प्रभावीपणे मांडली. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन वेगवेगळे मुद्दे असले तरी जर राजकीय पक्षात मतभेद असतील तर पक्ष कुणाचा निर्णय हा पक्षाच्या संविधानाच्या आधारे घ्यायचा असतो. मग पक्षाचं संविधान योग्य की अयोग्य, त्याच्या आधारे मूळ पक्ष कोणता हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा असतो, असा युक्तिवाद एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज कौल यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विचारांच्या विरोधात असलेल्या पक्षाशी युती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पक्षात एक प्रकारचा असंतोष निर्माण झाला होता, असा दावा एकनाथ शिंदेंच्या वकिलांनी केला. त्याआधारेच एकनाथ शिंदे यांनी आपलाच पक्ष मूळ शिवसेना असल्याचा दावा केल्याचे वकिलांनी यावेळी सपष्ट केले.
शिवसेनाप्रमुख पद हे 2013 पर्यंत होते. पण बाळासाहेब ठाकरेंच्या यांच्या नंतर हे पद गोठवण्यात आले होते. त्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष हे पद अस्तित्वात आले. उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष असताना शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. ती जबाबदारी कुणाची होती? या चुका उद्धव ठाकरे यांनी सुधारायला हव्या होत्या, असा युक्तिवाद एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाने या आधीच राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवताना विधिमंडळातील आमदारांची संख्या पाहणे गरजेचे आहे, असे सांगितले आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या प्रकरणात विधिमंडळातील आमदारांची संख्या निवडणूक आयोगाने लक्षात घेतली, असा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांनी केला. बुधवारी शिंदेंच्या वकिलांनी बाजू मांडल्यानंतर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 सप्टेंबरला कोर्टात होणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांचे वकील युक्तिवाद करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.