Shiv Sena will launch farmer help centres to assist farmers with crop insurance, compensation claims and government schemes. Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena UBT : दुष्काळातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्यात 'मदत केंद्र' उघडणार

Shiv Sena UBT Farmer Help Centres : शेतकरी मदत केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ योजनांची माहिती देण्याऐवजी त्यांच्या अर्ज आणि दाव्यांच्या प्रक्रियेतही मदत केली जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात 28 सप्टेंबर रोजी अमरावतीतून होणार आहे.

Jagdish Patil

Shivsena UBT Farmer Help Centres : राज्यातील अनेक भागांत यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी विविध मदतीच्या उपाययोजना आणि सवलती उपलब्ध होणार आहेत.

मात्र, या मदतीचा लाभ घेताना येणाऱ्या प्रशासकीय आणि कागदपत्रांच्या अडचणी दूर करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना पीक विमा, कर्जमाफी, नुकसानभरपाई आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ‘शिवसेना शेतकरी मदत केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे.

या केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ योजनांची माहिती देण्याऐवजी त्यांच्या अर्ज आणि दाव्यांच्या प्रक्रियेतही मदत केली जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात 28 सप्टेंबर रोजी अमरावतीतून होणार आहे. खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते पहिल्या मदत केंद्राचा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे.

पीक विम्याचे दावे दाखल करताना येणाऱ्या अडचणी, नुकसानभरपाई मिळवण्यासाठी करावयाची प्रक्रिया, कर्जमाफीशी संबंधित प्रश्न तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबाबत या केंद्रांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे.

अनेकदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज, कागदपत्रांची पूर्तता किंवा संबंधित विभागाकडे पाठपुरावा करावा लागतो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या प्रक्रियेत अडचणी येत असल्याने त्यांना मदत करण्यासाठी तालुकास्तरावर ही केंद्रे उभारली जाणार आहेत. ‘शेतकऱ्यांना सरकारी मदतीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे,’ अशी भूमिका शिवसेनेचे उपनेते आणि आमदार नितीन देशमुख यांनी मांडली आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि प्रश्न संबंधित शासकीय यंत्रणेकडे मांडून त्याबाबत पाठपुरावा करण्याचे कामही या केंद्रांच्या माध्यमातून केले जाणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून शेतकऱ्यांसाठी जाहीर होणाऱ्या मदतीचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी संघटनात्मक पातळीवर ही यंत्रणा उभी करण्याचा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेने घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT