Shivsena Politics : छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली. भुजबळांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही, असे अनेकांना वाटत होते. मात्र, धनंजय मुंडे यांच्या रिक्त मंत्रिपदावर भुजबळांना अखेर संधी मिळाली. या संधीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार प्रहार करण्यात आला आहे.
'भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाने फक्त भुजबळांची नव्हे, तर इतर अनेकांची शोकांतिका झाली. फडणवीस, एकनाथ मिंधे यांच भुजबळांच्या मांडीशी वैर होते. मंत्रिमंडळात भुजबळांची 'मांडी' नको हा त्यांचा पण होता. मात्र आत भुजबळांची मंत्रिमंडळात एण्ट्री झाली आहे. त्यामुळे स्वतःची मांडी खाजविण्याऐवजी यापुढे या दोघां भुजबळांची मांडी खाजवावी लागेल.', असा टोला 'सामना'मधून लगावण्यात आला आहे.
'हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना वेदना कशा होत नाहीत? लाज कशी वाटत नाही? वगैरे प्रश्न तेव्हा एकनाथ मिंधे उद्धव ठाकरे यांना विचारत होते. मिंधे वगैरे लोकांनी शिवसेना सोडून अमित शहांचे नेतृत्व स्वीकारले त्यामागे जी कारणे दिली त्यात भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणे जमणार नाही हे मुख्य कारण होते. शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्यांच्या वाऱ्यालाही उभे राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आता मिंधे यांची अशी कोंडी अमित शहा व फडणवीस यांनी केली आहे की, शिवसेनाप्रमुखांवर खऱ्या निष्ठा असतील तर राजीनामा द्या, नाहीतर मंत्रिमंडळात भुजबळांच्या मांडीवरचे केस उपटत दिवस ढकला.', असा टोमना देखील संपादकीयमधून मारण्यात आला आहे.
सामानत म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे यांच्या विरोधात ते (भुजबळ) जोरात उठले ते फडणवीस यांच्याच सांगण्यावरून, पण सरकार आल्यावर अजित पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही याचे सगळ्यात जास्त दुख: फडणवीस यांना झाले. आता धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागी फडणवीस यांनी भुजबळांना घेतले. अजित पवार यांचा इथे संबंध नाही.
'ठाकऱ्यांचे सरकार आम्ही खेचणार व भुजबळ, अजित पवारांना चक्की पिसायला पाठवणार, असे फडणवीस रोज बोलत होते. भुजबळ निर्दोष मुक्त झालेले नाहीत, फक्त जामिनावर सुटले आहेत याचाही उल्लेख फडणवीस जाणीवपूर्वक करीत असतं. मात्र आज चित्र असे आहे की, भुजबळ आणि अजित पवार हे दोघे नेते त्यांच्या ऐतिहासिक मांड्यांसह फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत भाजपचे लोक त्यांच्या मांड्यांना 'देवेंद्ररतन' तेल चोळून भ्रष्टाचाराचा पाया मजबूत करीत आहेत.' असा टोलाही लगावण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.