Sushma Andhare Sarkarnama
महाराष्ट्र

Sushma Andhare : धनंजय मुंडेंविरोधात करुणा मुंडेंचा लढा काबिल-ए-तारीफ!

Sushma Andhare Karuna Munde Case Decision : धनंजय मुंडेंविरोधात लागलेल्या या प्रकरणावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : करुणा शर्मा यांनी वांद्रे कौटुंबिक कोर्टामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केली होती. या कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या बाबत केलेले आरोप कोर्टाने मान्य केले आहेत. तसेच करुणा शर्मा यांना प्रतिमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश देखील दिले आहेत.

या पोटगीतील 1 लाख 25 हजार रुपये करुणा शर्मा यांना तर मुलगी शिवानी मुंडेला हिला तिच्या लग्नापर्यंत दरमहा 74 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दिले आहेत. मात्र या निकालापासून करुणा मुंडे या समाधानी नसून त्यांनी सहा लाख रुपयांची पोटगीची मागणी केली होती. त्यामुळे या निकाला विरोधात त्या हायकोर्टात जाणार असल्याचं समोर आला आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या केसमध्ये कोर्टाने दिलेल्या निर्णय अभिनंदन करण्यासारखा आहे. हा लढा फक्त महिलेच्या आर्थिक नुकसानीबाबतचा नाही तर तो महिलांच्या आत्मसन्मानाचा लढा आहे. ज्या संयमाने करुणा मुंडे यांनीही लढत दिली ती काबीले तारीफ आहे. एकल लढा देणाऱ्या महिलांसाठी हा संपूर्ण प्रवास हा प्रेरणादायी असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या.

या सर्व प्रकाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसंच महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना सर्व माहिती होती असं असताना देखील धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का सामावून घेण्यात आलं असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

मंत्रीपदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार फडणवीस यांना असताना देखील त्यांनी का कानावरती हात ठेवले आहेत. हा कळीचा मुद्दा असून याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करणे आवश्यक असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT