Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंना मोठा झटका; करुणा मुंडेंचे आरोप कोर्टाकडून मान्य, दिले महत्वाचे आदेश

Karuna Sharma in Court Wandre Family Court News : करुणा मुंडे यांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयात धनंजय मुंडे यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.
Dhananjay Munde, Karuna Sharma
Dhananjay Munde, Karuna SharmaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Latest News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सातत्याने चर्चेत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांना गुरूवारी मोठा झटका बसला. त्यांच्याविरोधात करुणा मुंडे यांनी केलेले आरोप कौटुंबिक न्यायालयाने मान्य करत त्यांना पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्यात मुंडे यांच्यावरील आरोप कोर्टाने मान्य केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

करुणा मुंडे यांनी कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत धनंजय मुंडे यांच्याविरोधात वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये त्यांनी दरमहा 15 लाख रुपयांची पोटगी मुंडे यांनी द्यावी, अशी मागणी केली होती. कोर्टामध्ये सुरूवातील करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत का, यावर युक्तीवाद झाला. हा युक्तीवाद कोर्टाने मान्य केला आहे.

Dhananjay Munde, Karuna Sharma
Rohit Pawar : मंदिर व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमावर शरद पवारांच्या पक्षाने घेतला आक्षेप!

कोर्टाने करुणा मुंडे यांना दरमहा 1 लाख 75 हजार आणि त्यांच्या मुलीला 75 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आलेला 25 हजार रुपयांचा खर्च देण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केलेेले आरोप कोर्टाने अंशत: मान्य केले आहेत.

कोर्टाच्या निकालावर मीडियाशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, एका मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीविरोधात ही लढाई होती. मी खूप सोसले आहे. मी 1996 पासून त्यांच्यासोबत आहे. माझ्या कुटुंबासाठी 15 लाख रुपये पोटगी मागितली होती. त्यासाठी हायकोर्टात जाणार आहे. मीच धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी होती. माझे उत्पन्न काही नाही. माझ्या नवऱ्याने जी गाडी दिली होती, ती माझ्याकडून घेऊन त्यांच्या वकिलाला दिली. येरवडा, बीड कारागृहात मला डांबण्यात आले होते. गाडीत रिव्हॉल्वर ठेवण्यात आले होते.

Dhananjay Munde, Karuna Sharma
Vijay Wadettiwar : 'मी आज जाणार नाही, उद्या मात्र खात्री नाही'; भुजबळ-फडणवीसांच्या मैत्रीवर वडेट्टीवार यांचा टोला

माझ्या वकिलांनी कोर्टात हे सिध्द करून दाखवले की मी त्यांची पहिली पत्नी आहे. यावरच कोर्टाकडून युक्तीवाद झाला. ते कोर्टाने मान्य केले. मी दोन लाखांत काय करणार, घराचा हप्ताच 1 लाख 70 हजार जातो. त्यामुळे घरचा खर्च कसा भागवणार, असा सवाल करत करुणा मुंडे यांनी हायकोर्टात जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com