Vijay Wadettiwar : सरकार बेशरमाचे झाड, वडेट्टीवारांची झणझणीत टीका

Congress leader Vijay Wadettiwar criticizes Maharashtra Government : माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे सरकार बेरशरमाचे झाड असल्याचा आरोप करून झणझणीत टीका केली.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरीवर फैरी झडत आहे. अंजली दमानिया यांनी त्यांच्या कृषिमंत्री असतानाच्या काळातील घोटाळेच बाहेर काढले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र महायुतीच्या नेते यावर भाष्य करण्याचे टाळत असल्याचे दिसून येते. यावर माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी हे सरकार बेरशरमाचे झाड असल्याचा आरोप करून झणझणीत टीका केली.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनात मुंडेचा सहभाग आहे. या प्रकरणात अटक करण्यात आले असलेले आरोप त्यांचे सहकारी आणि कार्यकर्ते आहेत. त्यांना मंत्रीमंडळातून काढले तर सरकारची इज्जत जाईल, सरकार भ्रष्टाचारी आहे हे सिद्ध होईल या भीतीने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. दमानिया (Anjali Damaniya) यांनी केलेले आरोप शंभर टक्के खरे आहेत. मी विरोधीपक्ष नेता असताना घोटाळा मांडला होता.

Vijay Wadettiwar
Chhagan Bhujbal Politics : नाराजीची चर्चा सुरू असतानाच भुजबळ लागले कामाला; फडणवीसांना लिहिले पत्र

एक मंत्री भ्रष्टाचार करण्यासाठी सचिव आणि आयुक्तांचा बदल्या करतो आणि त्यावर पांघरून घालण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्या बदल्यांना मंजुरी दिली होती. धनंजय मुंडेच्या (Dhananjay Munde) दबाव सरकार चालत होता, भ्रष्टाचार करण्यासाठी त्याला एक प्रकारे मोकळी दिली होती का असे प्रश्न आता उपस्थित होत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

आरोग्याचे पैसे दिले जात नाही. गडचिरोच्या एका मजुराने आत्महत्या केली. संजय गांधी निराधार योजना, कंत्राटदार, अंगणवाडी सेविका यांचे पैसे दिले जात नाही. आता लाडक्या बहिणींना पैसे देताना निकष लावल्या जात आहेत. उद्या अनेक जाचक अटी घालून बहिणींना पैसे देणेही बंद केले जातील. लाडक्या बहिणींचा अडीच कोटी पर्यंत गेलेला आकडा पंचवीस ते तीस लाखावर आणण्याचा प्लॅनिंग सुरू आहे. सरकारचे डोकं विकृत झाले असल्याचा थेट आरोप यावेळी वडेट्टीवार यांनी केला.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : 'मी आज जाणार नाही, उद्या मात्र खात्री नाही'; भुजबळ-फडणवीसांच्या मैत्रीवर वडेट्टीवार यांचा टोला

आमदार फुटणार, महायुतीत सहभागी होणार हा उदय सामंत यांचा दावा खोटा ठरला आहे. जुन्या कढीला ऊत देण्याचा कार्यक्रम सरकारचा सुरू आहे. एक्झिट पोलचे भाकीत अनेकदा खोटे ठरले आहे. त्यामुळे दिल्लीतील निवडणुकीतील एक्झिट पोलच्या आकड्यावर विश्वास ठेवू नका अशी सूचनाही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com