Shivraj Singh Chauhan News: महाराष्ट्रात सध्या लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा आहे. या योजनेमुळेच महायुतीचे सरकार विधानसभा निवडणुकीत पुन्हा ग्रँडविजय मिळवला. लाडकी बहीण योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राबवली होती. ते आता केंद्रीय कृषीमंत्री आहेत.
शिवराज सिंह चौहान यांनी आज (शुक्रवारी) नाशिकमधील मुक्त विद्यापीठाच्या कृषी प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी लाडकी बहीण योजनेवर मत व्यक्त केले. ते म्हणाले, 'हे जग काही फक्त पुरुषांसाठी नाही. त्यावर महिलांचा देखील तेवढाच अधिकार आहे. महिलांची प्रतिष्ठा वाढली हे सर्व केवळ लाडकी बहीण योजनेमुळे झाले. या योजनेमुळे सासू आणि नवरा देखील घरातील महिलांची प्रेमाने वागू लागले.'
'पुरुषांच्या हातात पैसे आले तर त्यातून गडबड होऊ शकते. मात्र, महिला तसे करत नाहीत. त्या पैसे वाया जाऊ देत नाहीत. त्यामुळे ही योजना नक्कीच कल्याणकारी आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी ही योजना राबवली. त्यामुळे राज्यात महिलांना आधार मिळाला. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.', असे देखील शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.
महाराष्ट्रात राबलेली लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश सरकारच्या योजनेची कॉपी मानली जाते. यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, 'ही योजना मी 2005 मध्ये राबवली. लाडकी लक्ष्मी योजना आणल्यामुळे राज्यातील महिलांचा जन्मदर वाढला. जर देवच भेदभाव करीत नाही. मग स्त्री आणि पुरुष यांच्या बाबत माणूस का भेदभाव करतो?
चौहान म्हणाले, 'जर मुली वाचल्या नाहीत तर ही सृष्टी कशी चालणार. हा गंभीर प्रश्न आहे. त्यावर राज्यकर्त्यांनी विचार करायला हवा. त्यावेळी मी मध्य प्रदेश मध्ये हे संकल्पना मांडली. मुलगी झाली तर ती लखपती असेल, असे मी घोषित केले.',
'मतदानासाठी आम्हीही योजना आणली नाही. महिलांच्या नावावर घर घेतल्यावर पैसे वाचतात. ती योजना आम्ही आणली आणि 'पप्पू' च्या आईच्या नावावर देखील घर होतं.', असा चिमटा देखील राहुल गांधी यांचे नाव घेता शिवराज सिंह चौहान यांनी काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.