Pune Collector News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना पदोन्नती मिळत ते जमाबंदी आयुक्त झाले आहेत. तर, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुणे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाले आहे.
जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाल्याने एकाच घरातील तीन अधिकारी पुणे जिल्ह्यात कार्यरत असणार आहेत. डुडी यांच्या पत्नी आंचल दलाल हे IPS असून त्या पुणे जिल्ह्यातील राज्य राखीव दलात (एसआरपीएफ) आहेत. त्यांचे भाऊ शेखर सिंह हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त आहेत.
पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झालेले जितेंद्र डुडी भारतीय प्रशासकीय सेवेतील 2016 बॅचचे अधिकारी आहेत.ते मुळचे राजस्थान येथील असून IAS परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना झारखंड केडर मिळाले होते. त्यांनी केंद्र सरकारमध्ये सहाय्यक सचिवपदी देखील काम केले आहे. झारखंड केडरचे असलेले डुडी यांचा विवाह IPS आंचल दलाल यांच्याशी झाला. दलाल यांना महाराष्ट्र केडर मिळाले होते. त्यामुळे डुडी यांना महाराष्ट्र केडरमध्ये बदली मिळाली आहे.
जितेंद्र डुडी यांना 2018 मध्ये महाराष्ट्र केडर मिळाले. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्ह्यात जुन्नर प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कारभार सांभाळला आहे. त्यानंतर ते सातारा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची बदली पुणे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे.
शेखर सिंह यांची पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती होण्याआधी ते सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांची जुलै 2022 मध्ये बदली झाली. त्यानंतर रुचेश जयवंशी यांची साताऱ्याचे जिल्हाधिकारी झाले. त्यांच्यानंतर साताऱ्याच्या जिल्हाधिकारी पदावर जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे जितेंद्र डुडी आणि शेखर सिंह या दाजी आणि मेव्हण्याने साताऱ्याचे जिल्हाधिकारी पद भूषवल्याचा दुर्मिळ योगायोग साधला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.