Ladki Bahin Yojana : अदिती तटकरेंच्या माहितीने विरोधकांचा "तो" दावा ठरणार खरा?

New information from Aditi Tatkare About Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्याचे काम सत्ताधारी महायुतीला किती लाभदायी? मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केलेल्या नव्या निकषांमुळे विरोधकांचा 'तो' दावा खरा ठरण्याची चिन्हे आहेत.
Aditi Tatkare
Aditi TatkareSarkarnama
Published on
Updated on

Aditi Tatkare News : महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली. आता या योजनेच्या लाभार्थ्यांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे एक नवा राजकीय वाद सुरू होतो की काय? अशी स्थिती आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेचा निवडणुकीत महायुतीला मोठा लाभ झाला. ते पुन्हा सत्तेत आले. मोठ्या बहुमताने निवडणुका जिंकता आल्या.

विधानसभा निवडणुकीत या योजनेवरून विरोधकांना चांगलाच झटका बसला. विरोधकांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ही योजना केवळ निवडणुकीपुरतीच आहे. त्यानंतर राज्य सरकार तिचा फेरविचार करेल, असा प्रचार केला होता. मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केलेल्या नव्या निकषांमुळे विरोधकांचा तो दावा खरा ठरण्याची चिन्हे आहेत.

या निमित्ताने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेतील पराभवामुळे खचलेल्या विरोधकांना एक नवा मुद्दा मिळाला आहे. या मुद्द्यामुळे महायुती सरकार विरोधात प्रचारासाठी विरोधकांना आयतेच कोलीत मिळते की काय? अशी स्थिती आहे. मंत्री तटकरे यांनी अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांना एकत्रित लाभ दीड हजार रुपये असेल, असे महत्त्वाचे विधान केले आहे.

Aditi Tatkare
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठी अपडेट! 'या' महिलांना फटका बसणार; मंत्री अदिती तटकरेंची माहिती

निराधार तसेच अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची मोठी संख्या आहे. या सर्व लाभार्थी आणि महिलांना लाडकी बहीण योजनेचा निधी मिळाला होता. नव्या निकषाची अंमलबजावणी केल्यास शासनाचा लाभ घेणाऱ्या हजारो महिलांना त्याचा फटका बसेल. परिणामी महिला वर्गात महायुती (Mahayuti) विरोधात वातावरण निर्मिती होण्यास हातभार लागेल.

येत्या दोन महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. मोठ्या बहुमताने सत्तेत आल्याने महायुतीचा आत्मविश्वास वाढलेला आहे. तर विरोधकांपुढे मतदारांसमोर कोणते विषय घेऊन जावेत, ही विवंचना होती.

Aditi Tatkare
Devendra Fadnavis : CM फडणवीसांच्या शासकीय दौऱ्यात इथून पुढे पोलिस मानवंदना देण्याची प्रथा बंद!

महिला आणि बालकल्याण विकास मंत्री तटकरे (Aditi Tatkare) यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांना एक महत्त्वाचा मुद्दा मिळाला आहे. आधीच ईव्हीएम आणि अन्य विषयांवरून वातावरण निर्मिती करण्याच्या प्रयत्नात असलेल्या विरोधकांचे मनोबल त्यामुळे वाढले तर नवल नाही.

एकीकडे राज्याच्या तिजोरीवर रोज पडणारा नवीन भार आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांबाबत वाढलेल्या अपेक्षा आणि यापूर्वी जाहीर केलेल्या योजना आणि घोषणा यांच्या पूर्ततेसाठी आर्थिक विवंचना अशा स्थितीत लाडकी बहीण योजनेचा आढावा अपेक्षितच होता. तसाच निर्णय झालेला आहे. मात्र त्यामुळे राज्यात एका नव्या राजकीय विषयाला चालना मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com