Chandrakant Khaire Offer : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ खासदारांनी बंडखोरी केल्याची चर्चा सुरु आहे. तसंच ते वेगळा गट करुन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. यावर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून उलटसुलट प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही आपल्याला ऑफर आल्याचं सांगत खळबळ उडवून दिली आहे.
माध्यमांशी बोलताना खैरे म्हणाले की, "आम्ही जे काही पदाधिकारी आहोत ते सर्वजण कुठेही गेलेलो नाहीत. मला काही ऑफर आली नाही का? मला खूप मोठी ऑफर आली होती. दोन तीन ऑफर आल्या होत्या, पण मी त्या नाकारल्या कारण मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे. सध्या शिवसेनेचे सहा खासदार गेलेत ना? आता तीन राहिलेले कुठेही जाणार नाहीत. कारण ते आमचे एकनिष्ठ खासदार आहेत. तसंच मुंबईचे ६५ नगरसेवकांपैकी कुणीही जात नाही. ते निवडणूच आलेत ते उद्धव ठाकरेंच्या ताकदीवर, त्यामुळं ते कुठेही जाणार नाहीत. आम्ही स्वतः उद्धव ठाकरेंना जबरदस्त सपोर्ट करु. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच शिवसेना खरी आहे हे आम्ही मजबुतीनं दाखवून देऊ," असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज दिवसभर शिवसेनेच्या खासदारांच्या बंडखोरीच्या बातम्या येत आहेत. हे सर्व ६ खासदार अद्यापही नॉट रिचेबल आहेत. त्यांचा कुठलाही संपर्क झालेला नाही. त्यामुळं त्यांनी खरंच बंड केलंय किंवा नाही हे स्पष्टपणे समोर आलेलं नाही. तसंच बंड झालेलं असेलच तर त्यासंदर्भातील पत्रावर सर्वांनी सह्या करुन ते लोकसभा अध्यक्षांना दिलं आहे की नाही? त्यासाठी हे पत्रही समोर आलेलं नाही. त्याचबरोबर या प्रकरणा खुद्द पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी एकही शब्द उच्चारलेला नाही. दुसरीकडं एकनाथ शिंदे यांनीही मौनच बाळगलेलं आहे, त्यामुळं अद्यापही सर्वकाही तळ्यात मळ्यात सुरु असल्याचं चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.