Ambadas Danve Meet Sonam Wangchuck  sarkarnama
महाराष्ट्र

Ambadas Danve Meet Sonam Wangchuk : उद्धव ठाकरेंचा शब्द शिलेदाराने पाळला, नरेंद्र मोदींनी दुर्लक्ष केलेल्या वांगचूक यांची घेतली भेट

Jagdish Pansare

Ambadas Danve News : सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यासाठी उपोषण सुरू केले होते. 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस कडाक्याच्या थंडीत उणे चार डिग्री सेल्सियस तापमानात उपोषण करणाऱ्या वांगचूक यांची दखल केंद्रातील मोदी सरकारने घेतली नव्हती. यावरून महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे गटाने मोदींवर टीका केली होती.

एवढ्यावरच शिवसेना Shivsena (ठाकरे गट) थांबली नाही तर, वांगचूक यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट लडाख येथे जाऊन नुकतीच सोनम वांगचूक यांची भेट घेतली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही वांगचूक यांच्यांशी फोनवरून संवाद साधत त्यांना पाठिंबा दर्शवला होता. ठाकरेंच्या पाठींब्याच्या शब्दाप्रमाणे विरोधीपक्ष नेते अंबदास दानवे यांनी वांगचूक यांची भेट घेतली. या भेटी संदर्भात अंबादास दानवे Ambadas Danve यांनी ट्विटरवर माहिती देत या भेटीची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत.

नुकतीच लडाखमध्ये दानवे यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्या शैक्षणिक संस्थेलाही भेट दिली आणि तेथील मुलांशी संवाद साधला. लडाखच्या लोकांसाठी नुकत्याच झालेल्या त्यांच्या आंदोलनाबाबत त्यांच्याशी चर्चा झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनही वांगचूक यांच्याशी फोनवरून चर्चा केली. लडाखी लोकांच्या हितासाठी सर्वत्तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी वांगचूक यांना दिल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

सामाजिक कार्यकर्ता आणि पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी केंद्रशासित असलेल्या लडाखला सहाव्या अनुसूचीच्या माध्यमातून पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा आणि इतर काही मागण्यांसाठी 6 मार्च रोजी आपले उपोषण सुरू केले होते. मात्र केंद्र सरकारने 20 दिवस उलटून गेल्यानंतरही त्यांना प्रतिसाद दिला नव्हता. उणे 4 डिग्री सेल्सियसमध्ये त्यांनी आपले उपोषण कायम ठेवले होते. अखेर 21 व्या दिवशी त्यांनी आपले उपोषण मागे घेत लढा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT