Sanjay Shirsat And Sanjay Raut sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Shirsat : 'होय, आमचा पक्ष अमित शाहचं चालवतात!', शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी थेट कबूलीच दिली

Sanjay Shirsat Responds to Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पण त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यांनी होय, आमचा पक्ष अमित शाहचं चालवतात! असं म्हटंल आहे.

Aslam Shanedivan

Mumbai News : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना, अमित शाह हेच शिंदे गटाचे प्रमुख आहेत, असा खोचक टोला लगावला होता. ही टीका आता शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत असून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देताना जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी अमित शाह हेच आमच्या गटाचे प्रमुख असल्याचे सांगितले आहे. यामुळे आता राज्यात राजकीय चर्चांना उधान आले असून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्ला चढवताना, अमित शाह हे शिंदे गटाच्या पक्षाचे प्रमुख असून ते आणि मोदीच राज्यातील तिन्ही पक्ष चालवतात अशी टीका केली होती. यावरून शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिरसाट यांनी, होय, अमित शाह आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. तेच आमचा पक्ष चालवताता. पण तुम्हाला याचं काय करायचय? असा संतप्त सवाल केला आहे.

तसेच शिरसाट यांनी अमित शाह आणि मोदीच राज्यातील तिन्ही पक्ष चालवत असतील तर त्याचा तुम्हाला त्रास का होत आहे? नालायक हो, तुम्ही काश्मीरमध्ये जाऊन राहुल गांधी यांची गळाभेट घेता तेव्हा? आम्ही अमित शाह आणि देशाचे पंतप्रधान यांना मानतो. आज त्यांचेच नेतृत्व असून देश पुढे जात असल्याचेही शिरसाट म्हणालेत.

दरम्यान ठाकरे गटाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर देखील टीका करण्यात आली होती. या टीकेचा देखील शिरसाट यांनी समाचार घेतला. यावेळी त्यांनी, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही इतरांची मदत घेतली तर काय बिघडलं? एकनाथ शिंदे हे संवाद साधणारे नेते असून ज्यांना पक्षाचं काही देणं घेणं नाही ते आज दुसऱ्यांच्या पक्षात बघत आहेत असाही टोला लगावला आहे.

हा निर्धार मेळावा नाही, तर....

ठाकरे शिवसेनेचा नाशिकमध्ये होणार्या निर्धार मेळाव्यावरुन देखील शिरसाट यांनी तोफ डागताना, त्यांचा हा निर्धार मेळावा नसून पक्ष बचाव मेळावा असल्याची टीका केली आहे. तसेच ठाकरेंना आपला पक्ष वाटवायचा असेल तर आधी ज्यांच्यामुळे पक्ष डॅमेज होतोय त्यांना दूर करा असाही सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच शिरसाट यांनी भास्कर जाधव तर त्या पक्षात राहतील की नाही अशी परिस्थिती असल्याचे सांगताना भास्कर जाधव पक्ष बदलतील असा दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT