Sanjay Shirsat On Chandrakant Khaire : मातोश्री तुमचं ऐकणार नाही, खैरेंना एक दिवस अंबादास दानवेंचे जोडे उचलावे लागतील!

Sanjay Shirsat urges Chandrakant Khaire to quit Uddhav Thackeray's faction and join their party : खैरेंना फोन न करणे, कार्यक्रमाची माहिती न देणे, न बोलवणे हा मुद्दाम केला जाणार प्रकार आहे. ज्यामुळे खैरे चिडतात आणि जाहीरपणे व्यक्त होतात. यातून त्यांची बदनामी मातोश्रीवर केली जाते.
Chandrakant Khaire Sanjay Shirsat News
Chandrakant Khaire- Sanjay Shirsat NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : मातोश्रीवर तुमचं ऐकलं जाणार नाही, अडीच वर्षापुर्वी आम्हीही त्यांना काही सांगायला गेलो होतो. काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, पण त्यांनी ऐकलं नाही, शेवटी पक्ष फुटला. चंद्रकांत खैरे यांची पक्षात जी अवस्था झाली आहे, त्याने उद्धव ठाकरे यांना काही फरक पडणार नाही. ते तुमचं ऐकणार नाही, आमच्याकडे या, एकनाथ शिंदे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जात आहेत. आज निर्णय घेतला नाही तर तुम्हाला एक दिवस अंबादास दानवे यांचे जोडे उचलावे लागतील, असा इशारा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांना दिला.

शिवसेनेतील खैरे-दानवे हा वाद न संपणारा विषय आहे, खैरेंनी आमच्याकडे यावे, त्यांचा योग्य मान राखला जाईल. ते ज्येष्ठ आणि निष्ठावंत आहेत, लवकर व्यक्त होतात. हे हेरूनच अंबादास दानवे त्यांना डिवचण्याचा प्रयत्न वारंवार करतात. खैरेंना फोन न करणे, कार्यक्रमाची माहिती न देणे, न बोलवणे हा मुद्दाम केला जाणार प्रकार आहे. ज्यामुळे खैरे चिडतात आणि जाहीरपणे व्यक्त होतात. यातून त्यांची बदनामी मातोश्रीवर केली जाते, असा आरोपही (Sanjay Shirsat) संजय शिरसाट यांनी केला.

लबाडांनो पाणी द्या, म्हणत महायुती सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाती अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. शिवसेनेचे दोन्ही नेते (Chandrakant Khaire) चंद्रकांत खैरे-अंबादास दानवे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. खैरे यांनी माध्यमांसमोर अंबादास दानवे यांच्यावर तोंडसुख घेतल्यानंतर आता हा वाद मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहचला आहे. खैरे सध्या मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत.

Chandrakant Khaire Sanjay Shirsat News
Sanjay Shirsat On Shivsena UBT : महापालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष दिसणार नाही! संजय शिरसाट यांची भविष्यवाणी

काल माध्यमांशी बोलतांना खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा खैरे-दानवे वादात उडी घेत खैरेंची बाजू घेतली. तसेच पुन्हा त्यांना पक्षात येण्याची आॅफर दिली. तर तिकडे शिंदेंच्या शिवसेनेत खासदार संदीपान भुमरे आणि संजय शिरसाट यांच्यात खैरेंना पक्षात घेण्यावरून मतभेद असल्याचे समोर आले आहे.

Chandrakant Khaire Sanjay Shirsat News
Chandrakant Khaire On Ambadas Danve : आम्ही पक्षासाठी जेलमध्ये गेलो, लाठ्या-काठ्या खाल्ल्या, अंबादास दानवे आला अन् काड्या करतो! चंद्रकांत खैरेंचा पारा चढला

खैरेंना पक्षात प्रवेश घेऊ देणार नाही, असे भुमरे सांगत आहेत, तर संजय शिरसाट यांच्याकडून मात्र खैरे यांना वारंवार टाळी देण्याचा प्रकार सुरू आहे. काल खैरे यांनी मी मरेपर्यंत पक्ष सोडणार नाही, अशी भूमिका घेत याबद्दल आता मला पुन्हा विचारू नका, असे बजावले होते. तसेच मी एकदा भूमिका स्पष्ट केल्यानंतर वारंवार मला आॅफर देण्याचे काय कारण? तुम्ही माझ्या मरायची वाट पहात आहात का? असा संताप खैरे यांनी व्यक्त केला होता. त्यानंतरही संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलतांना खैरे-दानवे यांच्या वादावर भाष्य करत खैरे यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षात आता थांबू नये, निर्णय घ्यावा आणि आमच्याकडे यावे, असे आवाहन केले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com