Uddhav Thackeray | Rahul Narwekar| Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena MLA Disqualification Case : सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंना दिलासा देणार? आमदार अपात्रताप्रकरणी आज सुनावणी

Supreme Court : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेत बहुमताच्या आधारे शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले.

Roshan More

Delhi Political News: शिवसेनेतील फुटीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांतील आमदारांना राहुल नार्वेकर यांनी अपात्र ठरवले नाही. मात्र, शिवसेना पक्ष आणि धनुष्य बाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (सोमवारी) सुनावणी होणार आहे. (Shivsena MLA Disqualification case)

सुप्रीम कोर्ट ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय देईल, असा विश्वास ठाकरे गटातील नेते व्यक्त करत आहेत. मागील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे (EKnath Shinde) यांच्या 39 आमदारांना नोटीस पाठवली होती. ठाकरे गटाने दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी फेरफार करून सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याचे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाची प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड योग्य ठरवली होती. असे असतानादेखील विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची निवड योग्य ठरवली. यावर ठाकरे गटाकडून ( Uddhav Thackeray group) आक्षेप घेण्यात आला आहे.

मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये ठाकरे गट मुंबई उच्च न्यायालयात न जाता थेट सर्वोच्च न्यायालयात आला, याविषयी सुप्रीम कोर्ट काय मत नोंदवणार याचीदेखील उत्सुकता आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालयाचे आयोजन करून विधानसभा अध्यक्षांवर जाहीर टीका केली होती. हा निकाल कसा चुकीचा आहे, हे त्यांनी सांगितले होते.

राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल

शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेतली. त्यानी आपला निकाल 10 जानेवारीला दिला होता. या निकालामध्ये विधिमंडळात असलेल्या बहुमताच्या आधारे शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले.

उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची नोंद शिवसेनेच्या मूळ घटनेत झाली नसल्याने शिवसेनेच्या मूळ घटनेनुसार हा निकला दिल्याचे राहुल नार्वेकर म्हणाले होते. आपल्या निकालात नार्वेकरांनी शिंदे गटाचे प्रताेद भरत गोगावले यांची निवड योग्य ठरवली, तर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची निवड अवैध ठरवली. दोन्ही गटांतील आमदारांनादेखील अध्यक्षांनी पात्र ठरवले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT