Uddhav Thackeray Group : ठाकरे गटाने 'या' मागणीसाठी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला अन् गडकरींकडेही केली मागणी!

Thackeray Group and Nitin Gadakari : 'सातारकरांची लूट होऊ देणार नाही, याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू.' असा इशाराही दिला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Satara News : पुणे- बंगळुरू महामार्गावरती कराड ते पुणे यादरम्यान तीन टोल नाके उभारण्यात आले आहेत. यामधील दोन टोल नाके सातारा जिल्ह्याच्या हद्दीत असल्याने वाहन चालकांना टोलचा भुर्दंड सोसावा लागत आहे‌. पाच- दहा किलोमीटरसाठी 60 किलोमीटरचा टोल भरावा लागत असल्याने नितीन गडकरींनी लक्ष घालण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

सातारा(Satara) जिल्ह्यात असणाऱ्या आनेवाडी व तासवडे टोल नाक्यांवर सातारा जिल्ह्यातील नागरिकांना टोल फ्री करावा. यासाठी सोमवारी सातारा शहराजवळ असणाऱ्या आनेवाडी टोल नाक्यावर ठाकरे गटाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या रास्ता रोकोमुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. या वेळी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, समन्वयक रामदास कांबळे, सुधीर राऊत, विश्वनाथ धनावडे, अजित यादव, माऊली पिसाळ यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Uddhav Thackeray
Sambhajiraje : लोकसभेला संभाजीराजेंना आघाडीचे पाठबळ? कोल्हापूरसाठी असा आहे मास्टर प्लॅन...

सचिन मोहिते म्हणाले, गेल्या दहा वर्षांचा उद्रेक आहे. अन्यायकारक पद्धतीने टोलवसुली सुरू आहे. यामुळे कोट्यवधींची टोलवसुली झाली आहे. अशाच पद्धतीने 2034 पर्यंत टोलवसुली सुरू राहणार असल्याचे मुजोर अधिकारी सांगताहेत. ही बाब खेदाची असून आम्ही आता हे सहन करणार नाही. सातारा जिल्ह्यातील नागरिक 5-10 किलोमीटरचा प्रवास करून 60 -60 किलोमीटरचा यापुढे टोल भरणार नाहीत.

याशिवाय नितीन गडकरींना(Nitin Gadakari) विनंती आहे, 'या गोष्टीचा तुम्ही बारकाईने विचार करावा. कराड ते पुणे यामधील अंतर मोजावे एवढ्या अंतरात तीन टोल नाके बसतात कसे? ही परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. सातारकरांची लूट होऊ देणार नाही. याच्यापेक्षा तीव्र आंदोलन शिवसेना उभे करेल. या पुढचं आंदोलन तासवडे टोल नाक्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून उभारण्यात येईल.'

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आठ दिवसांत बैठक

आंदोलकांना अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला नागरिकांची उपस्थिती असणार असून, जोपर्यंत लेखी हमी मिळत नाही. तोपर्यंत पुढील तीव्र आंदोलन बंद केले जाणार नाही, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Uddhav Thackeray
Narendra Modi MP Meeting : राज्यातील खासदारांची नरेंद्र मोदी घेणार शाळा; महाराष्ट्र सदनात भरणार वर्ग!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com