Bihar Politics : फ्लोअर टेस्टपूर्वी नितीशकुमारांचं टेन्शन वाढलं, 3 आमदार गायब; गडबड होणार?

Nitish Kumar floor test In Bihar News : बिहारमध्ये मोठा खेळ असल्याचे माजी उपमुख्यमंत्र्यांच्या दावा...
Bihar Politics :
Bihar Politics :Sarkarnama
Published on
Updated on

Bihar Political News : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील भाजपसोबतच्या एनडीए सरकारची उद्या 12 फेब्रुवारी रोजी बिहारमध्ये विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. या ठरावापूर्वी बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मंत्री विजय चौधरी यांच्या निवासस्थानी जेडीयू पक्ष विधिमंडळ पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठक आटोपल्यानंतर विजय चौधरी यांनी पत्रकारांशी स संवाद साधला. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की जेडीयूचे दोन-तीन आमदार आजच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. यामुळे तीन आमदारांनी बैठकीला दांडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Marathi News)

विशेष म्हणजे या बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या आमदारांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना रितसर माहिती दिली होती, असेही विजय चौधरी म्हणाले. दरम्यान, हैदराबाद (तेलंगणा) येथून पाटणा येथे पोहोचलेले बिहार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते शकील अहमद खान यांनी बिहारमध्ये 'वेगळा खेळ घडणार' असल्याचे म्हणत खळबळ उडवली आहे. आरजेडी नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी यापूर्वीच बिहारमध्ये विश्वासदर्शक ठरावावेळी मोठी घडणार असल्याचा दावा केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bihar Politics :
Ravindra Chavan's Criticism : 'महाविकास'ने थांबवलेले काम भाजपने केले पूर्ण; चव्हाणांचे काँग्रेस - राष्ट्रवादीवर टीकास्त्र...

पाटणा विमानतळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस नेते शकील अहमद खान म्हणाले, "उद्या विश्वासदरर्शक ठरावामध्ये सर्व स्पष्ट होईल. काँग्रेस पक्ष पूर्वीही एकत्र होता, आजही आहे आणि उद्याही तसाच राहील. पण सत्य हे आहे की, ज्या प्रकारे एपिसोड घडला आहे, सत्याचा विजय होईल. बिहारची काँग्रेस फोडण्याची हिंमत कोणातही नाही."

जेडीयू विधिमंडळाच्या बैठकीनंतर जेडीयू नेते विजय चौधरी म्हणाले की, "आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, आमच्याकडे बहुमत आहे. आमच्या आमदारांची संख्या 128 आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे बहुमत असणार आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे आमदार आणि विधान परिषद सदस्यांची बैठक झाली आम्ही काहीही लपवले नाही आणि आम्हाला काहीही लपवायचे नाही. आमचे जवळपास सर्वच आमदार बैठकीत होते. दोन-तीन आमदार उपस्थित नव्हते," असे ते म्हणाले.

Bihar Politics :
Latur Congress Meeting : 'नितीशकुमार हे देशातील सर्वात मोठे 'पलटूराम', त्यांचा...'; काँग्रेस नेत्याचा तिखट वार

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 15 दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या एनडीए सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाची सोमवारी विधानसभेत चाचणी होणार आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार विश्वासदर्शक ठराव मांडतील, ज्यासाठी सभागृहातील आमदार समर्थन आणि विरोधात मतदान करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com