Sanjay Raut Devendra Fadanvis sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : 'देवेंद्र फडणवीसांनी कपट कारस्थान करून महाराष्ट्राला कलंकित केले', संजय राऊतांनी तोफ डागली

Sanjay Raut Devendra Fadanvis : राज्याची जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. गुजरातमधून औरंगजेबाचे किती चेले चपाटे आले तर ठाकरेंचे नेतृत्व संपवता येणार नाही. महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महारांचा फॅन क्लब चालतो, असे संजय राऊत म्हणाले.

Roshan More

Sanjay Raut News : अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी आपल्यावर दबाव निर्माण केल्याचा गौप्यस्फोट केला. देशमुखांच्या आरोपानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आहे.

'देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देण्यात आले. पण कपट, कटकारस्थान करून महाराष्ट्राला त्यांनी कलंकित केले, असा हल्ला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला.

फडणवीस हे पावसाळ्यात उगवलेल्या छत्री प्रमाणे आहे. ज्या प्रकारे राजस्थान, मध्य प्रदेशात अनोळखी नेत्याला मुख्यमंत्री पद मिळाले. त्याच प्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली होती. देवेंद्र फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला.

विरोधकांना संपवण्यासाठी गृहखात्याचा गैरवापर केला. त्यांच्या अवतीभवती भ्रष्ट लोक आहे. भ्रष्ट लोक मंत्रिमंडळात आहेत त्यांच्या सोबतीने महाराष्ट्रात राज्य करताते. हे महाराष्ट्राला शोभणार नाही. चागंला गृहमंत्री असता तर अर्धे मंत्रिमंडळ जेलमध्ये असते, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला.

राज्याची जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. गुजरातमधून औरंगजेबाचे किती चेले चपाटे आले तर ठाकरेंचे नेतृत्व संपवता येणार नाही. महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महारांचा फॅन क्लब चालतो. औरंगजेब फॅन क्लब गुजरातमध्ये चालतो. औरंगजेबाचा जन्मच गुजरातच आहे, असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रावर आठ लाख कोटीचे कर्ज

महाराष्ट्रावर आठ लाख कोटीचे कर्ज आहे. हे कर्ज कोणी केले याचे उत्तर राज्यकर्त्यांकडे नाही. निवडणूक जिंकण्यासाठी घोषणा करतात. मुख्यमंत्री, अर्थमंत्री आज नीती आयोगाच्या समोर जाणार आहे. नीती आयोगा नितीमान असेल तर मुख्यमंत्र्यांना विचारतील पैसे कुठून आणतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT