Sanjay Raut Prakash Ambedkar Ramdas Athawale  sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : रामदास आठवले बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार, प्रकाश आंबेडकरांवर संजय राऊतांचा निशाणा

Sanjay Raut Prakash Ambedkar Ramdas Athawale : मुख्यमंत्री लोचट मजनू आहेत. दिल्लीसमोर झुकणारा मुख्यमंत्री पाहिले पण इतका लोचट मुख्यमंत्री पाहिला नाही, अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदें यांच्यावर केली.

Roshan More

Sanjay Raut News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपण ठाकरेंच्या शिवसेनेला खरी शिवसेना मानत नाही. शिंदे यांच्या बाजुने निकाल लागला आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदेंचा स्ट्राईक रेट देखील चांगला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली शिवसेनाही खरी शिवसेना आहे, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचा ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार रामदास आठवले आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना टार्गेट केले.

प्रकाश आंबेडकर यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील अशीच टीका केली होती. या टीकेनंतर आज (बुधवारी) संजय राऊत यांनी देखील प्रकाश आंबेडकरांवर टीका करत त्यांनी डिवचले. तसेच मुख्यमंत्री वारंवार दिल्ली वारी करत असून लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारी गेले आहेत, असे टोला एकनाथ शिंदेंना लगावला.

मुख्यमंत्री लोचट मजनू आहेत. दिल्लीसमोर झुकणारा मुख्यमंत्री पाहिले पण इतका लोचट मुख्यमंत्री पाहिला नाही, अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदें यांच्यावर केली. लाडक्या बहिणीवरून विरोधी पक्ष हे सावत्र भावासारखे वागत असलेल्या मुख्यंत्र्यांच्या टीकेला देखील राऊतांनी प्रत्युत्तर दिले.

महाराष्ट्रात सावत्रभाऊ नाहीत. महाराष्ट्राला अमित शाह-नरेंद्र मोदीच सावत्रपणाची वागणूक देत आहेत. महाराष्ट्राचे नुकसान अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी जेवढे केले तेवढे 100 वर्षात कोणी केले नाही, असे घणाघात राऊत यांनी केला.

पुढील मुख्यमंत्री ठाकरेच

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला ठाकरे गट लागला आहे. पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई हे नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत असून पुढील मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे हेच असतील असा दावा केला आहे. तर, कोकणात मिळालेल्या अपयशामुळे ठाकरेंचे उजवे हात समजले जाणारे मिलिंद नार्वेकर हे कोकणात गेले होते. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत रणनिती निश्चित केली आहे.

आंबेडकर तिसरी आघाडी उघडणार?

महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यापासून अंतरराखून असलेले प्रकाश आंबेडकर विधानसभा निवडणुकीत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महाविकास आणि महायुतीला सोडून तिसरी आघाडी स्थापन करून छोट्या पक्षांसह आंबेडकर निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, आंबेडकरांनी अजुनही ते तिसरी आघाडीसोबत जाणार की नाही, याची अधिकृत घोषणा केली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT