Abhishek Manu Singhvi : पराभवाचा धक्का बसलेल्या सिंघवींना काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी; आता विजय निश्चित...

Rajya Sabha Election Congress Telangana : काही महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत अभिषेक मनु सिंघवी यांचा धक्कादायक पराभव झाला होता.
Abhishek Manu Singhvi
Abhishek Manu SinghviSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी पुन्हा एका राज्यसभेच्या रिंगणात उतरले आहे. काँग्रेसने त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी मात्र त्यांचा विजय निश्चित आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आमदारांच्या बंडखोरीमुळे त्यांचा धक्कादायक पराभव झाला होता.

तेलंगणामध्ये राज्यसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सिंघवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता असून एक राज्यसभेचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. त्यामुळे सिंघवी यांचा विजय निश्चित आहे.

Abhishek Manu Singhvi
Gandhi-Bachchan Family : सोनिया अन् जया बच्चन यांची पुन्हा वाढतेय जवळीक; कधी तुटली होती ही दोस्ती?

के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षातील के. केशव राव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे पोटनिवडणूक होणार आहे. हिमाचल प्रदेशात सिंघवी यांना पराभवाचा धक्का बसला होता. पण तेलंगणातून ते राज्यसभेत पोहचणार, हे निश्चित आहे.

काय घडले होते हिमाचल प्रदेशात?

मार्च महिन्यात झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत सिंघवी यांचा पराभव झाला होता. यावेळी काँग्रेसकडे 40 आमदार होते. पण त्यापैकी सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. त्यामुळे सिंघवी यांना 34 तर भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांनाही 34 मते मिळाली. त्यानंतर चिठ्ठी काढण्यात आली आणि महाजन यांचे नाव निघाले. त्यामुळे त्यांना विजयी घोषित केले होते. सिंघवी यांनी यानंतर कोर्टातही धाव घेतली होती.

Abhishek Manu Singhvi
Shiromani Akali Dal : अकाली दल फुटीच्या उंबरठ्यावर; उरले फक्त दोन आमदार, ‘आप’ने दिला दणका

सिंघवी हे अनेक वर्षांपासून काँग्रेसचे नेते असून पक्षासह सरकारमध्येही त्यांनी महत्वाची पदे भूषवली आहेत. त्यामुळे हिमाचल प्रदेशातील पराभव पक्षाच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी पक्षाकडून संधीची वाट पाहिली जात होती. तेलंगणातून ही संधी मिळाली आणि सिंघवी यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यामुळे सहा महिन्यांतच पुन्हा ते राज्यसभेवर दिसणार आहे. एप्रिल महिन्यात त्यांची मुदत संपली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com