Sudhakar Badgujar Sarkarnama
महाराष्ट्र

Sudhakar Badgujar News : बडगुजर यांची तिसऱ्या दिवशी चौकशी सुरुच; पार्टीचा आयोजक कोण?

Bomb blast accused Salim Kutta party : बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी प्रकरण..

Amol Sutar

Sudhakar Badgujar News : शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची आज सलग तिसऱ्या दिवशी नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने कसून चौकशी केली असून अजून दोन दिवस चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले आहे.

भाजपा (BJP) आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळ अधिवेशनात सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी करतानाचे व्हिडिओ आणि फोटो दाखवले होते. त्यानंतर नाशिक (Nasik) पोलिसांच्या क्राईम ब्रँचने बडगुजर आणि व्हिडिओतील संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी पोलिसांना सहकार्याची भूमिका असल्याची बडगुजर यांनी प्रतिक्रीया दिली.

यावेळी बडगुजर म्हणाले, पोलिसांची चौकशीची एक प्रश्नावली आहे. त्यापद्धतीने ते व्हिडिओ क्लिप पाहून प्रश्न विचारत आहेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मी देत आहे. पुढील काळात ही जे काही प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे देणार असून पोलिसांना सहकार्य केले जाईल अशी माझी भूमिका आहे. अजून दोन दिवस चौकशीसाठी बोलावण्यात आलेले असल्याचेही बडगुजर यांनी सांगितले आहे.

सुधाकर बडगुजर यांची शुक्रवारी दि. 15 रोजी सायंकाळी दोन तास चौकशी केली. त्यानंतर शनिवारी दि. 16 रोजी पुन्हा सायंकाळी ५ वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुमारे साडेतीन तास शहर गुन्हेशाखेच्या युनिट एक येथे गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी चौकशी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी सलिम कुत्ता (Salim Kutta) याच्याशी झालेली ओळख, पार्टीचे ठिकाण, पार्टीचा आयोजक, पार्टीचे कारण यासह अनेक प्रश्नांची विचारणा करण्यात आली. मात्र बडगुजर यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना रविवारी दि. 17 रोजी पुन्हा चौकशीसाठी पोलिसांनी बोलाविले आहे. तर अजून दोन दिवस चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचेही बडगुजर यांनी सांगितले आहे.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT