Santosh Deshmukh Murder Case  Sarkarnama
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : धक्कादायक! संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर

Siddharth Sonawane : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होत्या. यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. पण आता या प्रकरणातील पहिला जामीन मंजूर झाला आहे.

Aslam Shanedivan

Beed News : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. यानंतर या घटनेचा स्टारमाईंड असणारा वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला होता. सध्या तो तुरूंगात असून इतरही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व आपोरींवर मकोका लावण्यात आला आहे. पण आता या प्रकरणातील एका आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या केल्यानंतर राज्यभर आंदोलने करण्यात आली होती. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात मोठे आरोप करत देशमुख कुटुंबीयांच्या मागे ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि आक्रोश मोर्चे काढत या लढ्याला बळ दिले होते. यादरम्यान पोलिनी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना अटक केली होती. पण अद्याप यातील एक आरोपी फरार आहे. त्या आरोपीलाही अटक करावी, यासह न्यायासाठी संतोष देशमुख कुटुंबीय आंदोलन करतच आहेत.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

दरम्यान आता या प्रकरणातील पहिला जामीन मंजूर झाला आहे. आरोपी सिद्धार्थ सोनवणेला केज कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 25 हजारांच्या जातमुचालक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असून सिद्धार्थ सोनवणेविरोधात पुरावे नसल्याने सीआयडीने आरोपपत्रात म्हटले आहे. यामुळे त्याचा नावाचा समावेश आरोपपत्रातून वगळण्यात आले होते. यामुळे आता सिद्धार्थ सोनवणेला जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणातील पहिलाच जामीन मंजूर झाला आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडामुळे बीडसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. तर संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते.

राज्य सरकारने या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीची स्थापना करत 1800 पानाच आरोपपत्र दाखल केलं होतं. या आरोपपत्रातून वाल्मिक कराड या हत्येचा मास्टरमाइंड असल्याच सीआयडीने म्हटलं आहे. ज्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय.

मकोका अंतर्गत कारवाई

संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. पण आता सिद्धार्थ सोनवणेला केज कोर्टाने जामीन मंजूर झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT