Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढणार; 'त्या' कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची देशमुख कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

walmik Karad controversy News : या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला मदत करून कायदा मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी देशमुख कुटुंबियानी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
 Walmik Karad Santosh Deshmukh Murder
Walmik Karad Santosh Deshmukh Murdersarkarama
Published on
Updated on

Beed News : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये सीआयडीने न्यायालयात तब्बल 1500 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रातुन अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुती सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांकडून केली जात असतानाच आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला मदत करून कायदा मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी देशमुख कुटुंबियानी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला अडीच महिन्यापेक्षा अधिकचा कालवधी लोटला आहे. या प्रकरणातील आठ आरोपीना ताब्यात घेऊन मोक्का लावला आहे. त्यातच आता सीसीटीव्ही डिलिट करून कायदा मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असा आरोप देशमुख कुटुंबाचे प्रतिनिधी दादासाहेब खिंडकर यांनी केला आहे.

 Walmik Karad Santosh Deshmukh Murder
Shivsena UBT Politics: शिवसेना ठाकरेंचे आंदोलन महापालिकेविरोधात, संताप झाला भाजपचा, काय आहे प्रकरण?

या प्रकरणातील आरोपींना मदत करून कायदा मोडणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे करणार असल्याचे देखील खिंडकर यांनी सांगितले.

 Walmik Karad Santosh Deshmukh Murder
BJP-Shivsena News : सत्तार, लोणीकरांना निवृत्तीचे वेध ? तर रावसाहेब दानवे अजूनही मैदानात!

या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड ज्या दिवसापासून तुरुंगात दाखल झाला आहे. त्या दिवसापासून तुरुंगातील सीसीटीव्ही बंद करण्यात आलेले आहेत. केवळ कराडला मदत करत असलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी हे केलेलं आहे. मात्र कराडला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून शिक्षा करावी, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचे दादासाहेब खिंडकर यांनी म्हटले आहे.

 Walmik Karad Santosh Deshmukh Murder
Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या नातीच्या छेडछाड प्रकरणी मोठी अपडेट; देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास गेल्या अडीच महिन्यापासून सुरु आहे. या प्रकरणात आठ आरोपीविरुद्ध मोक्का लावण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सीआयडी व विशेष पथकाने केली आहे. अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. या हत्या प्रकरणी पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले आहे. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर येत्या काळात या प्रकरणाच्या तपास कामाला वेग येणार आहे.

 Walmik Karad Santosh Deshmukh Murder
Raksha Khadse: केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसोबतच छेडछाड; जत्रेत काढला व्हिडिओ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com