Santosh Deshmukh Murder Case : दोषारोपपत्र दाखल होताच मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, 'ही केस...'

Beed Crime News : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास गेल्या अडीच महिन्यापासून सुरु आहे. या प्रकरणात आठ आरोपीविरुद्ध मोक्का लावण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सीआयडी व विशेष पथकाने केली आहे. अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. या हत्या प्रकरणी पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले आहे. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास केला. त्यांनतर या प्रकरणातील आरोपीना अटक केली. या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून या प्रकरणातील आरोपींनी कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर तपास कामाला वेग येणार आहे.

Devendra Fadnavis
Sharad Pawar MLA : टोकाची टीका केल्यानंतर शरद पवारांच्या आमदाराचा अजितदादांसोबत एकाच गाडीने प्रवास; मोठी खलबतं ?

या दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर ठाणे येथे प्रसार माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Devendra Fadnavis
Shivsena UBT News : शिंदेंच्या मंत्र्याच्या पंगतीत गेलेले 'ते' खासदार उद्धव ठाकरेंच्या दरबारात हजर!

त्यासोबतच आता येत्या काळात आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की, त्यांनी ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी. सरकारी वकील म्हणून उज्वल निकम (Ujjawal Nikam) यांची नियुक्ती केली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत. त्यांना कठोर शिक्षा कोर्ट देईल, असेही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Rahul Gandhi : स्वा. सावरकरांविरोधात केलेले वक्तव्य भोवणार? राहुल गांधींना नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश

या प्रकरणाचा पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केला आहे. नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे येत्या काळात आरोपींनी कठोर शिक्षा मिळेल, असा विश्वास राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

Devendra Fadnavis
Uddhav thackeray : 'आता उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त करणार'; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com