Rupali Chakankar Sarkarnama
महाराष्ट्र

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात, SIT कडून समन्स? खरातचे 'शिवनिका' प्रकरण भोवणार...

SIT Issues Summons Rupali Chakankar : अशोक खरात याच्या 'शिवनिका' संस्थेमार्फेत अनेक आर्थिक व्यवहार करण्यात आले होते. या संस्थेवर रुपाली चाकणकर या संचालक होत्या.

Roshan More

Rupali Chakankar News : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस आणि एसआयटीकडून चाकणकर यांना समन्स बजवाली माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी फेसबूकवर पोस्ट करत अखेर एसआयटीने रुपाली चाकणकर यांना समन्स बजावले असल्याचे म्हटले आहे.

अशोक खरात याच्या 'शिवनिका' संस्थेमार्फेत अनेक आर्थिक व्यवहार करण्यात आले होते. या संस्थेवर रुपाली चाकणकर या संचालक होत्या. दरम्यान, या संस्थेच्या सर्व आजी माजी सदस्य, संचालकांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

एसआयटीकडून या संस्थेच्या सदस्यांना चौकशीसाठी बोलण्यात येणार आहे. संस्थेच्या निधीचा वापर आणि खरात संदर्भात त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यातूनच चाकणकर यांना समन्स पाठवल्याची माहिती आहे.

रुपाली चाकणकर या अशोक खरात याला आपला गुरू मानत होत्या. खरात विरोधात नाव न घेता त्याच्या विरोधात फसवणुकीच्या प्रकरणात बातमी करणाऱ्या एका स्थानिक पत्रकाराला चाकणकर यांनी नोटीस पाठवत माफी मागण्यास सांगितले होते. तसेच त्याच्या पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले होते.

खरातच्या कोठडीत वाढ

अशोक खरात याची आज कोठडी संपत असताना त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. न्यायालायत दोन्ही बाजुने युक्तीवाद करण्यात आला. दरम्यान, न्यायालयाने खरातला आणखी चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. तोमुळे तो आणखी चार दिवस कोठडीत असणार आहे. एक तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT