

Nashik News : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याला बलात्कार प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. अशोक खरात याने केलेल्या लैगिंक शोषण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे. आएपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते या पथकाच्या प्रमुख आहेत.
दरम्यान याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरातने भोंदुगिरीच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. याचे अनेक व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आता खरातच्या अटकेदरम्यान घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अटकेवेळी नाशिक पोलिसांना त्याने विचित्र व पोकळ धमक्या दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच खरात आक्रमक झाला. नको ते बरळत सुटला. 'तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर कोप होईल' अशा शब्दांत त्याने पोलिसांना पोकळ धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचा थयथयाट पाहाता पोलिसांनी कडक शब्दांत समज देत परिस्थिती नियंत्रणात आणली.
गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे गुप्त कारवाई करत खरातला अटक केली होती. न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खरातला पकडण्यासाठी नाशिक पोलिसांनी स्मार्ट प्लॅन आखला होता. त्या प्लॅनचीही चर्चा सध्या होत आहे.
खरात राहत असलेल्या परिसरात चोर शिरल्याचा बनाव रचत पोलिसांनी खरातच्या घरात अचानक धाड टाकली. दरम्यान, घरात उपस्थित असलेल्या अशोक खरातला पाहताच पोलिसांनी क्षणार्धात त्याला ताब्यात घेतलं. दरम्यान तपासादरम्यान कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राइव्हमध्ये सुरुवातीला 58 व्हिडीओ क्लीप मिळाल्या. मात्र तशा शेकडो क्लीप असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच चौकशीत खरातकडून पोलिसांना सहकार्य मिळत नसल्याचंही सांगितलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.