Somnath Suryavanshi Death Case News Sarkarnama
महाराष्ट्र

Somnath Suryawanshi News : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सरकारला नोटीस ; प्रकाश आंबेडकरांनी न्यायालयात केला युक्तीवाद !

The division bench issued a notice to the government in the Somnath Suryavanshi case, with Prakash Ambedkar arguing the case on behalf of the defendant. : सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुढील कारवाई असेंब्ली किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याच्या गाईडलाईन्स कोर्टाने दिल्या पाहिजे.

Jagdish Pansare

High Court News : परभणी हिंसाचार प्रकरणात पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत आज पहिली सुनावणी झाली. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: यावेळी युक्तीवाद केला. सोमनाथ यांच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज पहिली सुनावणी पार पडली. या प्रकरणी सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे.

या पहिल्या सुनावणीत नेमका काय युक्तीवाद झाला या संदर्भात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी माध्यमांना माहिती दिली. आज न्यायालयाने कस्टोडियन डेथ च्या संदर्भात मॅजिस्ट्रेटने चौकशी करावी अशीच तरतूद आहे. मात्र त्यांच्या निर्णयानंतर कुणी आणि कसा निर्णय घ्यायचा? पुढची चौकशी कशी करायची? यासंदर्भातला कायदा अपुरा आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयाला सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे पुढील कारवाई असेंब्ली किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याच्या गाईडलाईन्स कोर्टाने दिल्या पाहिजे. या प्रकरणी पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी होणार आहे. या प्रकरणात आम्ही विशेष तपास समिती नेमावी, अशीही मागणी केली आहे. ही एसआयटी सरकार नाही तर न्यायालय नेमेल. (High Court) कोर्टाच्या अंतर्गतच ही समिती असेल. आता ही मागणी मान्य होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, या संदर्भात सरकारला नोटीस काढण्यात आली आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

परभणी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पुतळ्याशेजारी असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती. त्यांनतर उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात पोलीसांनी सोमनाथ सूर्यंवशी यांना अटक केली होती. न्यायालयाच्या आदेशानूसार पोलीस कोठडीत असताना त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता.

मात्र, राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सोमनाथच्या मृत्यूप्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाई व्हावी, यासाठी सोमनाथ यांच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज पहिली सुनावणी पार पडली असून यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या बाजूने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT