
Marathwada News : पाटोदा नगर पंचायतीतील भाजपाच्या नगरसेवकांनी मुलांच्या नावाने ठेकेदारी केली. ऑडीटमध्ये या ठेकेदारांकडून वसूलीचे निर्देश दिल्यामुळे सदर नगरसेवकांना अपात्र करण्याच्या निर्णयावर जिल्हाधिकारी निर्णय घेत नाही. त्यामुळे अपात्रतेचे प्रकरण दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्याकडे वर्ग करणाची विनंती करणाऱ्या याचिकेत शासनासह प्रतिवादींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम आदेश पारित करु नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे (Aurangabad High Court) न्यायमूर्ती मंगेश पाटील व मा. न्यायमूर्ती खोब्रागडे यांनी दिले आहेत. पाटोदा नगरपंचायतीचे नगरसेवक सय्यद अब्दुल्ला, बळीराम पोटे यांनी त्यांच्या कार्यकाळात स्वत:च्या मुलांना विविध कामांमध्ये ठेकेदारी दिली.
त्यावर पाटोदा नगरपंचायतच्या ऑडिटमध्ये रकमा वसुलीचे निर्देश दिलेले असल्याने शेख मोबीन, अब्लूक घुगे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शिवभूषण जाधव यांनी जून 2023 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत कायद्यानुसार सदर नगरसेवकांना अपात्र करण्याच्या संदर्भात अर्ज केला. (Beed News) सदरील प्रकरणात वेळोवेळी सुनावणी झाली. सध्या हे प्रकरण जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या समोर प्रलंबीत आहे.
एक वर्ष उलटूनही यामध्ये निर्णय दिलेला नाही. यातील सय्यद अब्दुल्ला हे राजकीय व्यक्तीमत्व असून, ते बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. बळीराम पोटे प्रभावी राजकारणी आहे. दोघेही आमदारांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून न्याय मिळणार नाही, अशी शंका व्यक्त करुन हे प्रकरण दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची व सुनावणीचा वेळ निश्चित करून निर्णय देण्याची विनंती शेख मोबीन, शिवभूषण जाधव यांनी याचिकेद्वारे केली आहे.
प्राथमिक सुनावणीत नगर विकास सचिव, विभागीय आयुक्त, बीड जिल्हाधिकारी तसेच सय्यद अब्दुल्ला, बळीराम पोटे यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम आदेश पारित करु नये, असे आदेशही देण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. नरसिंह जाधव यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. सोनाली सोमवंशी, ॲड. रवींद्र वानखेडे, ॲड. गौरव खांडे यांनी सहकार्य केले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.