Sonam Wangchuk offers to end his hunger strike with conditions as the NEET protest and Parliament march face uncertainty after Delhi Police deny permission. Sarkarnama
महाराष्ट्र

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांची सपशेल माघार? ज्या मुद्यावर आंदोलन त्याचा पडला विसर; मोदींचा मंत्री अलगद वाचणार!

Sonam Wangchuk Dharmendra Pradhan Resignation: नीट परीक्षा पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अलीकडच्या काळातील जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी,अशी अट सोनम वांगचुक यांची सरकारला घातली आहे.

Roshan More

Sonam Wangchuk latest statement on protest: सोनम वांगचुक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपोषणाच्या 21 व्या दिवशी पोलिसांनी बळजबरीने त्यांना ताब्यात घेत सफदगंज रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे हे आंदोलन पुढे जाणार की नाही याविषयी शंका होती. मात्र, अभिजीत दीपके हे जंतर मंतरवर उपोषणाला बसले आहेत.

सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून ट्विट करत सरकारपुढे उपोषण मागे घेण्यासाठी तीन अटी घातल्या आहेत. विशेष म्हणजे या तीन अटीमध्ये धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा उल्लेख नसल्याने आंदोलनकर्ते वांगचुक यांना आपल्या मुळ मागणीचा विसरला पडला का? अशी चर्चा आहे.

वांगचुक यांनी ट्विट करत म्हटले आहे की, सरकारने जर आमच्या तीन अटी मान्य केल्या तर आम्ही आंदोलन मागे घेण्यास तयार आहोत. त्यामध्ये नीट परीक्षा पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अलीकडच्या काळातील जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, मला आणि सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांना संसदेपर्यंत जाऊ देण्यात आले आणि तेथील खासदारांनी आम्हाला नीट पेपरफुटी प्रकरणावर संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले तर मी आमरण उपोषण मागे घ्यायला तयार आहे.

त्यांच्या तिसऱ्या अटीमध्ये म्हटले आहे की, जर माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मला संसदेत जाता आले नाही तर खासदार आणि अन्य नेत्यांनी सफदरगंज रुग्णालयात येऊन मला वरील सर्व गोष्टींबाबत आश्वासन द्यावे.

जंतर मंतरवर तुफान गर्दी

आज संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, मोर्चा काढम्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तरुण मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. सरकारच्या विरोधात येथे घोषणाबाजी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT