Supporters of Sonam Wangchuk march towards Delhi as the movement gains nationwide attention, with videos of the protest going viral on social media. sarkarnama
महाराष्ट्र

Sonam Wangchuk : सोनम वांगचुकांना पाठिंबा वाढला, समर्थकांची दिल्लीकडे कूच; 'तो' व्हिडिओ समोर

Sonam Wangchuk Supporters March : सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी दिल्लीकडे रवाना होणाऱ्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.

Roshan More

Sonam Wangchuk News : लडाखच्या संरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आता संपूर्ण देशातून प्रचंड पाठिंबा मिळताना दिसत आहे. सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी आणि त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक, विशेषतः तरुण वर्ग मोठ्या संख्येने देशाची राजधानी दिल्लीच्या दिशेने रवाना होत आहेत.

नुकताच या प्रवासादरम्यानचा एक रेल्वेमधील व्हिडिओ समोर आला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये सोनम वांगचुक यांना पाठींबा देण्यासाठी दिल्लीच्या दिशेने रेल्वेतून त्यांचे समर्थक जाताना दिसत आहे.या प्रवासात तरुण रेल्वे प्रवासात अत्यंत उत्साहाने आणि जोशात देशभक्तीपर गाणी म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून सोनम वांगचुक यांना बळजबरीने ताब्यात घेतले होते. त्यांची प्रकृती पाहता त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आंदोलकांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आता हे आंदोलन अधिकच पेटण्याची आणि उग्र रूप धारण करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

लढा तीव्र होणार

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असेल तरी मोठ्या प्रमाणात लोक दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे या आंदोलनाला पाठींबा मिळत असल्याचे दिसत आहे. अभिजित दीपके यांनी आम्ही आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच जेथे असाल तेथे आंदोलन करून पाठींबा देण्याचे आवाहन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT