Rajendra Bhosale News: सोनम वांगचुक यांनी शैक्षणिक सुधारणांसाठी जंतर मंतर येथे उपोषण सुरू केले होते. त्याला मालेगाव शहरातून प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून पाठिंबा दिला. पोलीसांच्या कारवाईने आंदोलन अधिक चिघळेल अशा इशारा देण्यात आला.
आज सकाळी दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर येथे सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले. राजकीय आणि दबाव तंत्राच्या माध्यमातून आंदोलन संपवण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केला. त्यावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
मालेगाव येथील राजेंद्र भोसले यांनी प्रारंभी भाजप आणि केंद्र सरकारने कुजबुज यंत्रणेमार्फत हे भाजप समर्थकांचे आंदोलन असल्याचे पसरवले. मात्र आंदोलन मिटत नाही, हे लक्षात आल्यावर तो डाव त्यांच्यावरच उलटला. त्यातून आज सकाळी दबाव तंत्राचा वापर करण्यात आला.
यापूर्वीही किसान आंदोलन आणि प्रा, अग्रवाल यांच्या गंगा स्वच्छता आंदोलनाला भाजप सरकारने असेच दडपले होते. सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनालाही असेच दडपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गेल्या दोन दिवसात देशभरातून आंदोलनाला पाठिंबा वाढत असल्याने सरकार घाबरले होते.
सोनम वांगचुक यांना आज सरकारने जबरदस्तीने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आंदोलन शमविण्यात दबाव तंत्र यशस्वी झाले असा सरकारचा समज आहे. परिस्थिती मात्र त्याच्या उलट होईल, असा दावा राजेंद्र भोसले यांनी केला.
राजेंद्र भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थी तसेच नागरिकांचा मार्च मालेगाव शहरात शुक्रवारी काढला. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला शहरातून वाढता पाठिंबा आहे. विविध संघटना आणि नागरिकांनी त्यात आंदोलनात भाग घेतला होता.
मालेगाव शहरातील मोसम पूल ते महात्मा गांधी पुतळा असा मार्च काढण्यात आला. त्यात विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. यावेळी राजेंद्र भोसले, सुभाष परदेशी, सुगंध संजय जोशी, उमेश अस्मर, प्रकाश वाघ, सागर पाटील यांसह विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भाग घेतला.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.