MSRTC NCMC Card Scheme News : ST महामंडळाने ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) कार्ड १ सप्टेंबर २०२६ पासून अनिवार्य केलं होतं. पण आता याबाबत निर्णय घेत या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता कार्डची सक्ती ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठांना दिलासा मिळाला आहे.
शासनाच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना एनसीएमसी NCMC कार्ड १ सप्टेंबर २०२६ पासून अनिवार्य करण्यात आले होते. शासनाच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना हा निर्णय बंधनकारक करण्यात आला होता. ज्यानंतर अनेक प्रवाशांनी कार्ड घेतले होते. पण हे कार्ड घेताना अनेक प्रवाशांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागले होते.
NCMC कार्ड अनिवार्य केल्यानंतर डिजिटल तिकीट प्रणालीवर प्रवाशांचा मोठा भार पडला. त्यामुळे एसटीच्या सर्व्हरवर ताण येऊन वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. सर्व्हर सतत डाऊन होणे, तसेच मोठ्या प्रमाणात 'हिट्स' वाढल्याने वाहकांना सवलतीची तिकिटे देताना अडचणी येत होत्या. परिणामी बस स्थानकांवर आणि बसमध्ये प्रवाशांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर महामंडळाने कार्ड सक्तीला मुदतवाढ दिली आहे.
३० सप्टेंबरपर्यंत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीप्रमाणे आधार कार्ड किंवा अन्य अधिकृत ओळखपत्र दाखवून सवलतीचे तिकीट घेता येणार आहे. त्यासाठी एनसीएमसी कार्ड असणे बंधनकारक राहणार नाही. महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी परिपत्रक क्रमांक ५५४४ जारी करून याबाबत सूचना दिल्या आहेत.
ज्या प्रवाशांकडे आधीपासून सक्रिय एनसीएमसी कार्ड आहे, त्यांना सवलतीच्या तिकिटासाठी त्याच कार्डाचा वापर करता येणार आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत प्रवाशांना जुन्या पद्धतीने ओळखपत्रावर किंवा सक्रिय एनसीएमसी कार्डद्वारे सवलतीचे तिकीट घेता येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.