Girish Mahajan ST Bus: गिरीश महाजनांनी ताफा सोडला, थेट एसटी पकडली; त्र्यंबकेश्वरच्या गर्दीत पालकमंत्र्यांचा ‘साधा’ प्रवास चर्चेत

Girish Mahajan travelled by bus to Trimbakeshwar: आपल्या वाहनांच्या ताफ्यामुळे भाविकांना त्रास होवू नये याची काळजी घेत महाजनांनी एसटीने प्रवास करायचा निर्णय घेतला. खंबाळे वाहनतळ ते त्र्यंबकेश्वरदरम्यान 4 किलोमीटर ते बसने गेले.
Guardian Minister Girish Mahajan travels by an MSRTC ST bus from Khambale parking area to Trimbakeshwar during the Shravan Somvar rush
Girish Mahajan convoy left for ST busSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan ST bus viral video: श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढलेली संख्या पाहता राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन, कुभमेळा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी खंबाळे वाहनतळ ते त्र्यंबकेश्वरदरम्यान 4 किलोमीटर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने प्रवास केला.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह आदींनीही बसने सोबतच प्रवास केला. त्यामुळे नाशिकमध्ये एकच चर्चा रंगली. या प्रवासाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला.

देशातील बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये आज श्रावण सोमवारनिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शन व ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी येतात. श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर आज प्रशासनाने त्र्यंबक शहरापासून चार किलोमीटर अंतरावर खंबाळे या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था केली आहे. तेथून एसटी बसने भाविकांना त्रंबकेश्वर पर्यंत व तिथून पार्किंग अशी एसटी बसची व्यवस्था केली आहे.

Guardian Minister Girish Mahajan travels by an MSRTC ST bus from Khambale parking area to Trimbakeshwar during the Shravan Somvar rush
Girish Mahajan : गिरीश महाजनांना आता नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, माजी मुख्यमंत्र्याचा नाशिकमध्ये येऊन हल्लाबोल

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या नियोजनाची पाहणी तसेच आपल्या वाहनांच्या ताफ्यामुळे भाविकांना त्रास होवू नये याची काळजी घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी एसटी बसमधून प्रवास करण्यास प्राधान्य दिले. यादरम्यान, पालकमंत्री महाजन यांनी श्रावण सोमवारनिमित्त जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेऊन काही मौलिक सुचनाही केल्या.

नाशिकला राज्यातील सर्वात हिरवागार जिल्हा करण्याचा प्रयत्न

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण सुरू असून, नाशिकला राज्यातील सर्वात हिरवागार जिल्हा करण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. ब्रह्मगिरी परिसरातही आज वृक्षारोपण करण्यात आले असून, केरळमधून चार हजार झाडे आणण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Guardian Minister Girish Mahajan travels by an MSRTC ST bus from Khambale parking area to Trimbakeshwar during the Shravan Somvar rush
Girish Mahajan : जावयाच्या ठेक्याने पेटला कुंभमेळ्याच्या निधीचा वाद ; राऊतांच्या आरोपांना महाजनांचं ‘पुरावा दाखवा’ आव्हान

राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभध्वजारोहण

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर आणि साधुग्राम परिसरातील कामांचा आज आढावा घेण्यात येणार आहे. पावसामुळे ज्या ठिकाणी पाणी साचले होते, त्या ठिकाणी आवश्यक कामे करून किंवा जागेची उंची वाढवून साधुग्राम उभारता येईल का, याचा विचार सुरू असल्याचे महाजन यांनी सांगितले. कुंभमेळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण केली जातील, तसेच पुढील महिन्यात राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभध्वजारोहण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com