maharashtra election commission Sarkarnama
महाराष्ट्र

ZP Panchayat Samiti Election : राज्य निवडणूक आयोग सज्ज; मतदार यादीबाबत तुम्ही कोणत्या तक्रारी करू शकता?

State Election Commission Preparations for Elections : एकाच सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या एकापेक्षा अधिक मतदारांचे अर्ज त्या संस्थेच्या अध्यक्ष किंवा संचिवांमार्फत, त्या संस्थेच्या लेटर हेटवर, संबंधित सचिव किंवा अध्यक्षाच्या सहीने एकत्रितपणे सादर करता येतील.

Rajanand More

थोडक्यात महत्वाचे :

  1. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी विधानसभा मतदारयादीच ग्राह्य धरली जाणार असून 8 ऑक्टोबर रोजी तात्पुरती मतदारयादी जाहीर होईल.

  2. 14 ऑक्टोबरपर्यंत मतदार नाव चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्यास किंवा वगळले गेल्यास नागरिक हरकती व सूचना दाखल करू शकतात.

  3. नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज व पुराव्यासह तक्रार नोंदवणे आवश्यक आहे; गठ्ठा स्वरूपातील अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

What Complaints Can Be Filed About the Voter List : राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी विधानसभेच्या मतदारयाद्याच ग्राह्य धरल्या जाणार आहेत. या मतदारयाद्यांवर आता आयोगाने हरकती व सूचना मागविल्या आहेत. आयोगाकडून 8 ऑक्टोबरला तात्पुरती मतदारयादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर 14 ऑक्टोबरपर्यंत त्यावर हरकती व सूचना नोंदविता येतील.

मतदारयादीवर हरकती व सूचना कोणत्या प्रकारच्या असू शकतील, याबाबत आयोगानेच माहिती दिली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संबंधित क्षेत्रातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही प्रभागनिहाय मतदार यादीमध्ये कोणत्याही प्रभागात नावे समाविष्ट करण्यात आली नसल्यास हरकती नोंदविता येतील. त्याचप्रमाणे चुकीच्या प्रभागात नावे समाविष्ट झाल्यासही हरकत घेता येईल.

अशा मतदारांची नावे मतदारयादीव योग्य प्रभागात समाविष्ट करण्यासाठी मतदाराने स्वत: तसा विहित नमुना अ अर्ज दिलेल्या मुदतीत वास्तवाच्या पुराव्यासह दाखल करणे आवश्यक आहे. एकाच सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या एकापेक्षा अधिक मतदारांचे अर्ज त्या संस्थेच्या अध्यक्ष किंवा संचिवांमार्फत, त्या संस्थेच्या लेटर हेटवर, संबंधित सचिव किंवा अध्यक्षाच्या सहीने एकत्रितपणे सादर करता येतील.  

कोणत्याही परिस्थितीत एक गठ्ठा पध्दतीने किंवा एकत्रित यादींच्या स्वरुपात हरकती दाखल करता येणार नाही व असे अर्ज विचारात घेणे आवश्यक असणार नाही, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संबंधित क्षेत्रातील विधानसभा मतदारयादीत नावे नसूनही प्रभागनिहाय मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यात आले असल्यास अशा मतदारांची नावे वगळण्यासाठी तक्रारदाराने दिलेल्या मुदतीत ‘नमुना ब’मध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित तक्रारदार हा त्यात प्रभागातील मतदार असायला हवा.

मतदारयादीत नाव, लिंग, चुकीचे टंकलेखन किंवा इतर माहिती चुकीची असल्यास मतदाराने नमुबा ब अर्जासोबत आयोगाने मतदाराची ओळख पटविण्यासाठी विहीत केलेल्या व मतदाराचे छायाचित्र असलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: तात्पुरती मतदारयादी कधी प्रसिद्ध होणार?
A: 8 ऑक्टोबर रोजी.

Q2: हरकती व सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
A: 14 ऑक्टोबर.

Q3: चुकीच्या प्रभागात नाव समाविष्ट झाल्यास काय करावे?
A: विहित नमुन्यातील अर्ज व वास्तवाचा पुरावा सादर करावा.

Q4: गठ्ठा स्वरूपात अर्ज दाखल करता येतील का?
A: नाही, प्रत्येक अर्ज स्वतंत्र सादर करावा लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT