Toilet Scam : धक्कादायक : ग्रामसेवक अन् कंत्राटदारांचा शौचालय घोटाळा; लाभार्थ्यांमध्ये 11 मृतांची नावे...

Role of Gramsevaks and Contractors in the Scam : धुळे जिल्ह्यातील शिरधाने गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शौचालये न बांधताच त्याचे पैसे ग्रामसेवकाने कंत्राटदारांशी संगनमत करून लाटले आहेत.
"Dhule toilet scam exposed as Gramsevaks and contractors list 11 deceased persons as beneficiaries."
"Dhule toilet scam exposed as Gramsevaks and contractors list 11 deceased persons as beneficiaries."Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra toilet scam : स्वच्छ भारत मिशन ही ग्रामीण विकासाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र या योजनेच्या नावावर चक्क ग्रामसेवक आणि कंत्राटदारांनी संगनमत केले. अगदी शौचालयाचे पैसेही खाल्ले. या संदर्भात शिरधाने (धुळे) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि 16 कंत्राटदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये चक्क मृत व्यक्तींच्या नावेही पैसे काढून शौचालय बांधल्याचा दावा होता. हा गैरव्यावर उघडकीस आल्यावर अनेकांना धक्का बसला आहे.

शिरधाने गावातील ग्रामसेवक आणि 11 कंत्राटदार यांनी संगनमत करून 50 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला. सर्व पैसे त्यांनी आपल्या खिशात घातले. त्यांच्या विरोधात पोलिसात अपहार व भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराची कथा अतिशय सुरस आहे.

ग्रामपंचायतीला 2015 ते 2020 या कालावधीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निधी मंजूर झाला होता. या निधीतून गाव स्वच्छ आणि सुंदर रहावे म्हणून शौचालय बांधण्याचा प्रस्ताव होता. योजना मंजूर झाल्यावर ग्रामसेवकांने कंत्राटदारांना हाताशी धरून भ्रष्टाचार केला. नियमानुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याऐवजी ते थेट कंत्राटदारांना देण्यात आले.

"Dhule toilet scam exposed as Gramsevaks and contractors list 11 deceased persons as beneficiaries."
Local Body Elections : ‘सुप्रीम’ आदेशानंतर 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आयोगाचं पहिलं मोठं पाऊल 

गावातील शंकर भदाणे या जागृत नागरिकाने थेट लोकायुक्तांकडे याबाबत तक्रार केली. लोकायुक्तांनी या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा परिषदेला आदेश दिले. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी घरोघर जाऊन प्रत्यक्ष तपासणी केली. त्यात हा घोटाळा उघड झाला. यामध्ये 426 शौचालय प्रत्यक्षात बांधकाम न करताच त्यांचे पैसे हडप करण्यात आले. लाभार्थ्यांची यादी तयार करतानाही घोटाळा केला. यामध्ये अकरा मृत व्यक्तींच्या नावे शौचालय बांधल्याचे दाखविण्यात आले.

"Dhule toilet scam exposed as Gramsevaks and contractors list 11 deceased persons as beneficiaries."
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंना ‘हे’ पाऊल उचलावंच लागेल; सरकारकडून दुर्लक्षित विभाग 'सशक्त' करायचाय...

व्यक्तीच्या नावाने देखील बनावट पावत्या करून हे पैसे कंत्राटदार आणि ग्रामसेवकाने खिशात घातले. विस्तार अधिकारी जगताप यांनी गतवर्षी जुलै 24 मध्ये त्याची तपासणी केली. त्यात हा भ्रष्टाचार उघड झाला. ग्रामविकास विभागात आणि शासनाच्या योजनांमध्ये अनेकदा भ्रष्टाचार होतो. मात्र चक्क शौचालयांच्या नावाने भ्रष्टाचार करून पैसे खाण्याचा प्रकार धक्कादायक ठरला आहे. या योजनेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणे आवश्यक आहे, याची खातरजमा बंधनकारक करण्यात आली आहे. यातूनच हा धक्कादायक घोटाळा उघड झाला.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com