Devendra Fadnavis And Sudhir Mungantiwar .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Government: सुधीर मुनगंटीवार पुन्हा नाराज..; CM फडणवीसांसमोरच केलं मोठं विधान; म्हणाले, 'इंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट...'

Maharashtra Politics: विधानसभेच्या 2024 मध्ये मंत्रिमंडळातून ऐनवेळी पत्ता कट झाल्यानं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी सातत्यानं आपल्याच महायुती सरकारचेही बरेचदा कान टोचल्याचं दिसून आलं आहे. अशातच पुन्हा एकदा मुनगंटीवारांची नाराजी उफाळून आली आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: भाजपमधील आजच्या घडीला एक अनुभवी,अभ्यासू नेते म्हणून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाहिले जाते. राज्य आणि केंद्रीय पातळीवरही भाजपाच्या शीर्ष आणि ज्येष्ठ नेतृत्वामध्ये सुधीर मुनगंटीवारांचा समावेश केला जातो. गेल्या 40 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेले मुनगंटीवार यांना आपलं म्हणणं मांडत असताना त्यांची आकडेवारी आणि अचूक संदर्भ,तसेच अधिवेशन किंवा इतरही ठिकाणी सडेतोड भूमिका मांडताना सध्या ते सरकारवरही तुटून पडल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. आता मुनगंटीवारांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभेच्या 2024 मध्ये मंत्रिमंडळातून ऐनवेळी पत्ता कट झाल्यानं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी सातत्यानं आपल्याच महायुती सरकारचेही बरेचदा कान टोचल्याचं दिसून आलं आहे. अशातच पुन्हा एकदा मुनगंटीवारांची नाराजी उफाळून आली आहे.

विधानपरिषदा तसेच राज्यातील विविध जिल्हा बँकांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालं आहे. याचदरम्यान, आता हिवाळी अधिवेशनाचे पडघम वाजू लागले आहेत. सरकार तसेच प्रशासकीय पातळीवर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दृष्टीनं जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर येथे 7 ते 18 डिसेंबर दरम्यान होत असलेल्या अधिवेशनाची कालावधीवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरच अधिवेशनासाठी दोन आठवड्यांचा कालावधी कामकाजासाठी अपुरा असून "इंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट असा मेसेज बाहेर जायला नको," अशी संतप्त भूमिका यावेळी मांडली.

विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाल्याचं समोर आलं आहे. त्यांनी नागपूर येथील आगामी हिवाळी अधिवेशन हे किमान तीन आठवड्यांचं असावं, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री फडणवीसांसमोरच केली.

मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रस्तावांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर दोन आठवड्यांत सविस्तर चर्चा व सर्व घटकांना न्याय मिळणं कठीण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

यावर विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आजमितीला तरी 7 ते 18 डिसेंबर या दोन आठवड्यांच्या कालावधीला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, कामकाजासाठी दिवस अपुरे पडल्यास कामकाज सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेऊन अधिवेशन पुढे वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप बोनस जाहीर न झाल्यावरुनही त्यांचा विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत तिळपापड झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं धानाचा बोनस जाहीर करावा, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT