Uday Samant : ठाणे पोलीस आयुक्तांनंतर उदय सामंत यांचाही मोबाईल हॅक; फेसबुक आणि ट्विटर अकाउंटलाही फटका, पैसे दिल्याचा खुलासा

Uday Samant Mobile and Social Media Accounts Hacked : एकीकडे ठाणे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा मोबाईल हॅक केल्याच्या बातमीनं खळबळ उडाली असतानाच आता महायुतीतील एका मंत्र्यांचेच मोबाईल, फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप खाते हॅक करून त्यावर अश्लील व्हिडिओ स्टेटसला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि संबंधित व्हॉट्सॲप खाते बंद करून आक्षेपार्ह व्हिडिओ हटवण्यात आले. हे प्रकरण ताजे असतानाच आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही सायबर हॅकिंगचा फटका बसल्याचे समोर आले आहे. आपला मोबाईल, फेसबुक आणि ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती खुद्द उदय सामंत यांनी दिली आहे.

सध्या सायबर हॅकिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून सर्वसामान्य नागरिकांपासून ते वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांना याचा फटका बसत आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्यानंतर आता राज्याच्या मंत्र्याचे सोशल मीडिया अकाउंटही हॅक झाल्याची माहिती समोर आल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ठाणे पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप हॅक झाल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही आपल्याबाबतीत असाच प्रकार घडल्याचे सांगितले. आपला मोबाईल, फेसबुक आणि ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. वाढते तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेले सायबर हॅकर्स यामुळे अशा घटना घडत असाव्यात, असेही त्यांनी नमूद केले. पोलीस अधिकारी असले तरी तेही माणूसच आहेत. त्यांच्याकडे कोणतीही वेगळी शक्ती नाही. त्यामुळे त्यांचाही मोबाईल हॅक होऊ शकतो, असे उदय सामंत म्हणाले. तसेच सायबर हॅकर्सच्या प्रकारामुळे आपल्यालाही कोणालातरी ३ हजार ५०० रुपये द्यावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

Uday Samant
Uday Samant : शिवसेना नेत्याचा जयकुमार गोरेंना इशारा : ‘एवढं हिणवू नका; अन्यथा गोकुळ होतं, हे लक्षात ठेवा’

आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप खाते नेमके कसे हॅक झाले?

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप खाते मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हॅक झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ प्रसारित होण्यास सुरुवात झाली. त्यांच्या स्टेटसवर जवळपास १२ अश्लील व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर आली. हा प्रकार लक्षात येताच ठाणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली करत संबंधित व्हॉट्सॲप खाते बंद केले आणि स्टेटसवरील व्हिडिओ हटवले. दरम्यान, पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते नेमके कोणी आणि कशा पद्धतीने हॅक केले, याचा तपास सुरू आहे.

Uday Samant
Uday Samant News: महायुतीमध्ये काहीतरी घडतंय, बिघडतंय, एकनाथ शिंदे नाराज...? उदय सामंत खरं काय ते बोलून मोकळे झाले

ठाणे पोलिसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर दिसणाऱ्या कोणत्याही व्हिडिओवर विश्वास ठेवू नये, तसेच ते व्हिडिओ डाउनलोड, प्रसारित किंवा फॉरवर्ड करू नयेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले होते. याशिवाय या व्हॉट्सॲप खात्यावरून येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद मेसेज किंवा लिंकला प्रतिसाद देऊ नये, असेही सांगण्यात आले. या प्रकरणाबाबत नागरिकांनी अफवा पसरवू नयेत आणि सोशल मीडियावर कोणतीही अप्रमाणित माहिती शेअर करू नये, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.