Sudhir Mungantiwar Sarkarnama
महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar Funny Speech : '...तर अर्ध्या आमदारांच्या बायका या हिरोईनी असत्या', सुधीर मुनगंटीवारांनी सांगितला 'तो' किस्सा

Sudhir Mungantiwar Mla : मुनंगटीवार म्हणाले, 'मी निवडणूक प्रचाराच्या काळातील भाषणात एक वाक्य म्हटलं होतं तुम्ही मला निवडून त्या तुमचं कोणतही काम असे मी पूर्ण शक्तीने करेल तर तरुणाने अजब मागणी केली.

Roshan More

Sudhir Mungantiwar News : माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सातत्याने चर्चेत आहेत. विरोधकांसोबत ते सरकारला देखील टोमणा मारण्याची एकही संधी गमावताना दिसत नाही. मात्र, राजकीय वक्तव्य करणाऱ्या मुनंगटीवार हे आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. त्यांनी एका तरुणाने त्यांच्याकडे केलेल्या अजब मागणीचा किस्सा नाशिकमधील एका व्याख्यानमालेत सांगितले.

मुनंगटीवार म्हणाले, 'मी निवडणूक प्रचाराच्या काळातील भाषणात एक वाक्य म्हटलं होतं तुम्ही मला निवडून त्या तुमचं कोणतही काम असे मी पूर्ण शक्तीने करेल. तर, एक तरुण माझ्या समोर आला अन् म्हणाला, तुम्ही म्हणाला होता ना कोणतही काम असुद्धा मी पूर्ण शक्तीने करेल तर माझ एक काम आहे. मी दहावी नापास आहे. एम ए झालेली मुलगी मला आवडेत माझे लग्न तुम्ही लावून द्या. मी मनात म्हटलं लग्न लावायचं आमदाराच्या हातात असतं तर निम्मा आमदारांची लग्न हिरोईनीसोबत झाली असती. '

आमदार हिरोसारखे वागतात...

सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस विधीमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, आजकालचे आमदार हिरोसारखेच वागतात हेही तेवढेच खरे आहे. तरुण पिढीदेखील हिरोसारखीच आहे पण ती फक्त दिसण्यातून नसावी कामातूनही असावी. त्यांच्या कामातून, समाजसेवेतून लोकांच्या भल्यासाठी, विकासाठी त्यांची कृती हिरोपणाची असेल तर नक्कीच त्यांना हिरोईन मिळेल. पण त्यांच्या डोक्यात कोणती हिरोईन आहे हे मला माहीत नाही.

नाशिकला तीन मंत्रिपदं...

नाशिकला पालकमंत्रिपदाबाबतच तिढा अजून सुटला नाही, हा विषयी सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकरांनी विचारले असता ते म्हणाले, पालकमंत्री असायला हवा पण नसल्याने फार काही फरक पडत नाही. नाशिकला तीन मंत्री आहेत आणि ते पूर्ण क्षमतेने विकास कामे करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT