Sunetra Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर, आज आमदाराची महत्त्वाची बैठक, विलीनीकरण, झिरवळ प्रकरणावर निर्णय होणार?

Sunetra Pawar NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसची आज कोअर कमिटी आणि आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाच प्रकरणाबाबत तसेच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Roshan More

Sunetra Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसती सुनेत्र पवार यांच्या हाती आली आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्या राजकीय कार्यक्रमांपासून दूर होत्या. मात्र, मागील दोन तीन दिवसांपासून त्या सक्रीय झाल्या आहेत. दिल्ली पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली.

सुनेत्रा पवार सक्रीय होत असताना विलीनकरणाच्या चर्चा जोर धरत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात एक लिपीक लाच घेताना सापडला. त्यामुळे झिरवळ यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली जात आहे. त्यामुळे झिरवळ यांच्याबाबत काय निर्णय होणार याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी आज (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटीची बैठक बोलवली असल्याची माहिती आहे. आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे. या बैठकीत विलीनीकरण आणि नरहरी झिरवळ यांच्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

झिरवळ यांनी आपल्याशी हा या प्रकरणाचा संबंध आढळला तर आपण राजीनामा देऊ, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने सुनेत्रा पवार त्यांच्याबाबत मोठा निर्णय घेण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

आमदारांची आज बैठक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार आहे. अजित पवार हे आमदारांची साप्ताहिक बैठक घेत विकास कामांचा आढावा घेत होते. त्याच प्रमाणे सुनेत्रा पवार या देखील आज आमदारांची साप्ताहिक बैठक घेणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT