Shivsena UBT : 'मुंबईतील रस्त्यांना 'टिपू'चे नाव द्यायचा प्रस्ताव भाजपचाच; महापौर रितू तावडे साक्षीदार, आपल्या फायद्यासाठी त्याची कबर...' ठाकरेंचा घणाघात

Tipu Sultan controversy : 'टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे. टिपूचे काम व छत्रपतींचे कार्य समकक्ष असल्याचे बोलून सपकाळांनी भाजपच्या हाती कोलीत दिले. मुळात ही अशी तुलनाच होऊ शकत नाही. यावर देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाने काँग्रेसला धारेवर धरले. काँगेसची नैतिकता, लाज, लायकी काढली.'
Shivsena UBT On Malegaon Tipu Sultan controversy
Shivsena UBT On Malegaon Tipu Sultan controversySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 16 Feb : मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हे प्रकरण भाजपने लावून धरलं आहे. एकीकडे हा वाद चिघळताच टिपूचा फोटो उपमहापौरांच्या दालनातून काढण्यात आला.

पण दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ  टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे, असं वक्तव्य केल्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलं. ते इतकं की काल पुण्यात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांच्या आमने-सामने आले यात अनेकांची डोकी देखील फुटली आहेत.

अशातच आता या सर्व प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. शिवाय भाजपने आपल्या सोयीसाठी टिपू सुलतानला पुन्हा कबरीतून बाहेर काढल्याचा दावाही सामनात केला आहे. तसंच यावेळी सपकाळ यांच्या वक्तव्याशी देखील सामनातून असहमती दर्शवली आहे.

सामनात लिहिलं, 'टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे. टिपूचे काम व छत्रपतींचे कार्य समकक्ष असल्याचे बोलून सपकाळांनी भाजपच्या हाती कोलीत दिले. मुळात ही अशी तुलनाच होऊ शकत नाही. यावर देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाने काँग्रेसला धारेवर धरले. काँगेसची नैतिकता, लाज, लायकी काढली. टिपूसारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करायचे काम सपकाळ यांनी केले व ते निंदनीय असल्याचे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

छत्रपतींना टिपूच्या बरोबरीने उभे करणे हे निंदनीय आहेच. टिपू सुलतानचे नाव घेतल्यावर भाजपवाल्यांना सोयीनुसार शिसारी येते हे खरे, पण याच टिपू सुलतानला पाकिस्तानात ‘नायक’ म्हणून गौरविले जाते. त्या पाकिस्तानबरोबर भारत क्रिकेट सामने खेळत आहे हे फडणवीस व भाजपला निंदनीय वाटू नये याचे आश्चर्य वाटते. शिवाय मुंबईतील रस्ते, बगिचे यांना टिपू सुलतानचे नाव द्या, असे प्रस्ताव महापालिकेत मांडणारे महाभाग आज ‘भाजप’मध्ये आहेत व ते या निवडणुकीत भाजपतर्फे महापालिकेत पोहोचले, त्यांचे काय करणार? असा सवाल सामनातून केला आहे.

तर महापालिकेत भाजपच्या ‘टिपू’ प्रेमाचे रेकॉर्ड उपलब्ध आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपूची भलामण केल्याबद्दल त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला, पण टिपूला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याची प्रेरणा देणाऱ्यांवर कोणतीच कारवाई होत नाही. टिपू सुलतानचा एक फोटो हा हिंदू-मुसलमान वादासाठी फायद्याचा ठरतो, तिथे या लोकांना राष्ट्रभक्तीची उबळ येतेच येते, पण पुलवामा, पहेलगाममध्ये हिंदू रक्ताचे सडे पाडणाऱ्या पाकड्यांबरोबर आजही क्रिकेटचा सामना खेळला गेला, तेथे सगळे थंड थंड, असं सामनात म्हटलं आहे.

Shivsena UBT On Malegaon Tipu Sultan controversy
MVA tension : महाविकास आघाडीत भूकंप! चंद्रपूरच्या 'त्या' युतीचा हिशोब उद्या मातोश्रीवर; स्थानिक नेत्यांच्या मनमानीवर उद्धव ठाकरे घेणार कडक अ‍ॅक्शन!

तर टिपू सुलतान म्हैसूरचा राजा होता. त्याने ब्रिटिशांबरोबर लढाया केल्या. तो योद्धा होता, पण स्वतःचे राज्य, साम्राज्य वाचवण्यासाठी तो ‘युद्ध’ करीत होता. छत्रपती शिवाजीराजांचे तसे नव्हते. छत्रपतींनी मोगलांचे आक्रमण रोखण्यासाठी हिंदवी स्वराज्य शून्यातून उभे केले. त्यांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. टिपूला राज्य वारशाने लाभले. छत्रपतींनी स्वराज्याच्या शत्रूंना याच मातीत गाडले.

औरंगजेब, अफझलखान असे मोगल राजे व सरदार हिंदवी स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी महाराष्ट्रावर चाल करून आले तेव्हा छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य रक्षणासाठी तलवार उपसली हा इतिहास आहे. छत्रपती मोगलांविरुद्ध लढले. टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढला. 4 मे 1799 रोजी टिपू सुलतान श्रीरंगपट्टणमच्या ब्रिटिशांबरोबरच्या लढाईत मारला गेला. टिपू सुलतानने इंग्रजांना रोखण्यासाठी बलिदान केले असे काही इतिहासकारांचे आणि भाजपचेही ठाम मत आहे, असा टोलाही सामनातून भाजपला लगावला आहे.

Shivsena UBT On Malegaon Tipu Sultan controversy
Satara Politic's : सातारा झेडपीत भाजपचा अध्यक्ष होणार; पण कसा? शंभूराज देसाईंशी पॅचअप कोण करणार?

शिवाय टिपू हा इंग्रजांबरोबरच्या लढाईतला पहिला स्वातंत्र्य सैनिक होता, असे इतिहासकार सांगतात. मात्र टिपूने हिंदूंच्या बाबतीत जबरदस्तीची धर्मांतरे घडवून आणली, मंदिरे पाडली, हिंदूंचा छळ केला, असेदेखील सांगितले जाते. त्यामुळे टिपूच्या मानपानावरून ‘हिंदू विरुद्ध मुसलमान’ असे झगडे नेहमीच झाले. ते या ना त्या कारणाने उफाळून येतात. तसंच टिपूवर गायत्रीवरील बलात्काराचा डाग असून तो कधीच पुसला गेला नाही.

टिपू सुलतान हा भारतातला असला तरी त्याच्या शौर्यामुळे पाकिस्तानात त्याला एक ‘नायक’ म्हणून ओळखले जाते. पाकिस्तानमध्ये तो एक पूजनीय योद्धा आहे. त्यामुळे टिपूला भारतीय मुसलमानांनी ‘नायक’ मानणे हे सर्वस्वी चूक आहे, असे ठाम मत सामनातून व्यक्त करण्यात आले आहे.

मात्र, भाजपने राजकीय फायद्यासाठी अनेकदा टिपूचा गौरव केला व आता भाजपने आपल्या फायद्यासाठी टिपूची कबर खणली आहे, पण त्या कबरीत तेच पडले आहेत. मुंबईतील रस्त्यांना 'टिपू'चे नाव द्यायचा प्रस्ताव भाजपचाच होता. विद्यमान महापौर रितू तावडे त्याच्या साक्षीदार आहेत. तरीही टिपूच्या नावाने त्यांचे टिपऱ्या बडवणे सुरूच आहे. निर्लज्जम सदासुखी, अशा शब्दात ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com