Sunetra Pawar Amit Shah Meeting : नाशिक येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण समारंभाचे निमंत्रण राष्ट्र्पती मुर्मू यांना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे नेते बुधवारी दिल्ली दरबारी गेले होते. त्यापूर्वी सोमवारपासूनच सुनेत्रा पवार या दिल्ली मुक्कामी होत्या. यावेळी त्यांनी खासदार पार्थ पवार यांच्या समवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी राज्यातील राष्ट्रवादीच्या वाट्याचे अर्थखाते पुन्हा मिळण्यासोबतच मंत्रिपदे बदलण्याची देखील इच्छा त्यांनी अमित शाहांकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांने दिली आहे. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अमित शाहांकडे पुन्हा एकदा बैठक पार पडली. त्यामुळे दिल्ली दरबारी पार पडललेल्या या बैठकीनंतर येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अंतर्गत बदलाचे वारे वाहू लागले आहे. तीन दिवसांपूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची अमित शाहांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली होती. राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेलं अर्थखाते आहे ते पुन्हा मिळाले पाहिजे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणखी काही फेरबदलांचाही निर्णय या बैठकीत चर्चेत आल्याची माहिती आहे. या अनुषंगाने महत्त्वाची चर्चा गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एका वृत्तवहिनीला दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra pawar), खासदार पार्थ पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गृहमंत्री अमित शाहांच्यासोबत बुधवारी दिल्लीत एक बैठक पार पडली आहे, त्या बैठकीमध्ये राज्यातील घडामोडी संदर्भात आणि अर्थ खाते त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका मांडली आहे.
त्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षात कोणते बदल होणार का? याची उत्सुकता आता लागून राहिली आहे. मात्र, पक्षामध्ये अंतर्गत बदल होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे, गेल्या काही दिवसांमध्ये पार्थ पवार यांनी पक्षाची कमान हाती घेतली आहे, त्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय ते घेत आहेत, त्यामध्ये आता संघटनात्मक बदल करण्यासाठी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात, याची चर्चा आता रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.