DCM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Vidhan Parishad Candidate NCP : सुनेत्रा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटल्या, शेवटच्या क्षणी सुत्रं फिरली! राष्ट्रवादीकडून 'या' नेत्याला उमेदवारी फिक्स?

last minute political change Maharashtra NCP leader candidate : सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राजकारणात खळबळ. राष्ट्रवादीकडून उमेदवारी फिक्स, या नेत्याला मिळणार संधी.

Rashmi Mane

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विविध पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्यासाठी जोरदार चर्चा सुरू असून काही ठिकाणी शेवटच्या क्षणी समीकरणे बदलताना दिसत आहेत. यातच आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ही भेट सुमारे 45 मिनिटे चालल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेचा नेमका विषय जाहीर करण्यात आलेला नसला, तरी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे, या भेटीनंतर काही राजकीय घडामोडींना वेग आल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उमेदवारीबाबत हालचाली वाढल्या आहेत. 28 एप्रिल रोजी पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. या चर्चेनंतर माजी आमदार झीशान सिद्दिकी यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसऱ्या बाजूला, शिवसेना शिंदे गटातही बैठकींचा धडाका सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निलम गोऱ्हे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे समजते. तसेच दुसऱ्या जागेसाठी बच्चू कडू यांच्या नावावरही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ आल्यामुळे सर्वच पक्षांमध्ये हालचाली तीव्र झाल्या आहेत. 12 मे रोजी मतदान होणार असल्याने आगामी काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. कोणाला संधी मिळते आणि शेवटच्या क्षणी कोणती नवी राजकीय समीकरणे तयार होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT