Sunetra Pawar, the newly designated Deputy CM of Maharashtra, pictured ahead of her oath-taking ceremony, where she is expected to succeed Ajit Pawar in both government and party leadership roles. Sarkarnama
महाराष्ट्र

DCM Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे पहिल्या फेरीत 3 खाती : अजितदादांच्या निधनानंतर रिकामी आहेत तब्बल डझनभर पदे

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचीही सूत्रे सोपवली जाणार आहेत. अर्थ, नियोजन आणि पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीबाबत महायुतीत सध्या खलबते सुरू आहेत.

Hrishikesh Nalagune

Ajit Pawar Death News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित झाले आहे. आज (शनिवारी) त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक व वक्फ ही खाती सोपवण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थ खाते सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवले आहे.

अजितदादांकडे होती डझनभर पदे :

अजित पवार यांच्याकडे सरकार, सहकार, क्रीडा, शिक्षण आणि राष्ट्रवादी संघटना अशा विविध ठिकाणच्या डझनभर जबाबदार्‍या होत्या. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थ, नियोजन, क्रीडा, वक्फ, राज्य उत्पादन शुल्क या विविध खात्यांचे मंत्री होते. शिवाय पुण्याचे पालकमंत्री आणि बीडचे पालकमंत्रीही होते.

संघटनेमध्ये ते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. सहकारात ते माळेगाव आणि इतर कारखान्याचे अध्यक्ष, मार्गदर्शक, प्रमुख नेते होते. कात्रज दूध संघ, पुणे जिल्हा बँकेचे ते मार्गदर्शक होते. क्रीडा क्षेत्रात ते महाराष्ट्र ऑलिंपिक संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष होते. शिक्षणात ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, रयत शिक्षण संस्थेमध्ये सक्रिय होते. शिवाय ते बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदारही होते.

यापैकी आता सुनेत्रा पवार यांच्याकडे प्राथमिक पातळीवर उपमुख्यमंत्री आणि क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक या खात्यांच्या कार्यभार देण्यात आला आहे. अर्थ आणि नियोजन खाती, पुण्याचे आणि बीडचे पालकमंत्रीपद हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडेच रहावे यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आग्रही आहेत.

मात्र याबाबत आताच निर्णय होणार नसल्याचे सांगितले जाते. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अजितदादांच्या निधनानंतर अस्थिर नेतृत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्याकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचीही सूत्र दिली जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणाबाबत चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. त्याचवेळी सहकार, शिक्षण आणि इतर जबाबदाऱ्यांबाबत आता सुनेत्रा पवार काय करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT