Sunetra Pawar’s unexpected call to Harshvardhan Sapkal fuels speculation ahead of the Baramati by-election. sarkarnama
महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal: "सुनेत्रा पवारांनी गुंगी गुडिया नाही, तर दुर्गा असल्याचे सिद्ध करावं" हर्षवर्धन सपकाळ यांचा युटर्न

Harshwardhan Sapkal: राष्ट्रवादीच्या आक्रमक पवित्र्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा युटर्न? म्हणाले, "सुनेत्रा पवारांनी गुंगी गुडिया नाही, तर...

Amit Ujagare

Harshwardhan Sapkal: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना गुंगी गुडीया असं संबोधलं होतं. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी थेट काँग्रेसच्या कार्यालयांवर हल्लाबोल चढवला होता. राष्ट्रवादीच्या या आक्रमक पवित्र्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी युटर्न घेतला असून सुनेत्रा पवार यांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

आपल्या विधानावरुन निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. यात त्यांनी म्हटंल की, इंदिरा गांधी यांना देखील एकेकाळी गुंगी गुडीया असं म्हटलं गेलं. पण आपण गुंगी गुडिया नाही हे त्यांनी आपल्या कर्तुत्वातून त्या टीकेला उत्तर देत असताना सिद्ध करुन दाखवलं. त्यामुळं पुढे अटलबिहारी सारख्या माणसालाही त्यांना दुर्गा असं म्हणावं लागलं.

त्यामुळं इंदिरा गांधी या मजबूत अशा पंतप्रधान, एक अत्यंत परखड आणि धाडसी पंतप्रधान अशी प्रतिमा त्यांची तयार झाली. राष्ट्रवादीनं मधल्या काळात गुलाबी रंग वापरणारी ज्या एजन्सीकडं प्रतिमा उजवळ्यासाठीचं काम दिलं होतं. त्या एजन्सीसारखं तयार केलेलं इंदिरा गांधींचं नेतृत्व नव्हतं, त्यामुळं इंदिरा गांधी या स्व:कर्तुत्वानं कणखर स्वरुपाची प्रतिमा त्यांनी तयार केली होती. आज जर आम्ही टीकेच्या माध्यमातून सुनेत्राताईंना कुठे गुंगी गुडिया म्हटलं असेल तर त्यांनी हे सिद्ध करावं की त्या दुर्गा आहेत. तसंच दुर्गा असल्याचं सिद्ध करण्यासाठी त्यांनी ताबडतोब अर्थ खातं स्वतःकडं घ्यावं, स्वतःच्या पक्षाकडं घ्यावं. तसंच अजित पवारांच्या अपघाताचा छडा लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी सांगावं.

तसंच त्यांनी तातडीनं अजितदादांनी लाडक्या बहिणींचं अनुदान १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करुन दाखवावी. तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णयही त्यांनी ताबडतोब घ्यावा. तसंच स्मार्ट मीटरचा निर्णय त्यांनी रद्द करावा त्याची होळी करावी आणि जर त्यांनी हे केलं तर आम्ही जे आरोप केले ते चुकीचे ठरतील आणि त्यांना महाराष्ट्र दुर्गा म्हटल्याशिवाय राहणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT