Shivsena News : उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या फुटीर खासदाराला शिवसैनिकाचा थेट फोन; 'साहेब, खरंच सांगतो, तुम्ही पुन्हा निवडून येणार नाहीत'

Political News : उद्धव ठाकरे यांची साथ सोडत सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सहा फुटीर खासदाराविषयी ग्रामीण भागात रोष दिसून येत आहे.
MP Nagesh patil ashtikar
MP Nagesh patil ashtikarSarkarnama
Published on
Updated on

hingoli News : राज्याच्या राजकारणात गेल्या 15 दिवसापूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. उद्धव ठाकरे यांची साथ सोडत सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सहा फुटीर खासदाराविषयी ग्रामीण भागात रोष दिसून येत आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यातच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. विशेषतः त्यांच्या चिरंजीवाला नांदेड मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी दिलेली असतानाही त्यांनी साथ सोडली. त्यांच्याविषयी शिवसैनिकात मोठा रोष आहे. अशातच एका शिवसैनिकाने हिंगोलीचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांना थेट फोन लावून पक्षांतर का केले म्हणून जाब विचारला असल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडलेल्या सहा खासदारांना त्यांच्या पक्षातील नेते व कार्यकर्त्याच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच दुसरीकडे सोडून गेलेल्या खासदारांना जाब विचारा असे फर्मानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी काढले आहे. त्यामुळेच एका शिवसैनिकांनी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांना जाब विचारला असल्याचे समोर आले आहे.

MP Nagesh patil ashtikar
Shivsena MP: 'निष्ठावंत' म्हणून मिरवणारे खासदारही फुटले,तिथेच शिंदेच्या बंडावेळी माघारी फिरलेल्या दोन आमदारांची तळपायाची आग मस्तकात गेली; म्हणाले...

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये शिवसैनिक खासदार आष्टीकराना म्हणाला की, 'साहेब, तुम्ही उद्धव साहेबांच्या सैनेतून तिकडे का गेले? तुमच्यासाठी आम्ही गावोगाव हिंडलो, मशालीसाठी आम्ही परेशान झालो, साहेब तुम्ही हे बरोबर नाही केले. तुम्ही पुन्हा निवडून येत नाहीत साहेब, शंभर टक्के सांगतो, पुन्हा तुम्ही निवडून येत नाहीत. या क्ल्पिमधील आवाज हा हदगाव तालुक्यातील ईरापूर येथील शिवसैनिक नंदकिशोर देशमुख यांचा असल्याचे समोर आले आहे.

MP Nagesh patil ashtikar
Shivsena MP: 'निष्ठावंत' म्हणून मिरवणारे खासदारही फुटले,तिथेच शिंदेच्या बंडावेळी माघारी फिरलेल्या दोन आमदारांची तळपायाची आग मस्तकात गेली; म्हणाले...

शिवसैनिक नंदकुमार देशमुख यांनी व्हायरल क्लिपवर बोलताना म्हणाले, ‘नागेश पाटील आष्टीकर हे मशाल चिन्हावर निवडून आले. ते आता पक्ष सोडून गेले हे त्यांना शोभते का? तुम्ही पाटील आहात, पाटलांना हे शोभत का? त्यांची गद्दारी ही हिंगोलीसाठी कलंक आहे. साहेबांनी त्यांना विश्वासाने उमेदवारी दिली होती. मी त्यांना तेच विचारत होतो. त्यानंतर त्यांनी सांगितले की, मला येऊन भेट, अजून ही त्यांची दादागिरी संपलेली नाही.’

MP Nagesh patil ashtikar
Sanjay Raut : '...म्हणून शरद पवार सचिन अहिरांकडे ढुंकूनही पाहत नव्हते'; राऊतांनी सांगितला जुना किस्सा : मोदी-शहा अन् फडणवीस-शिंदेवर जोरदार हल्लाबोल

मला एकच चीड आहे, त्यांना मी मतदान केले आहे. खिशातील पैसे खर्च केले, त्यांनी खासदार व्हावे म्हणून आम्ही प्रयत्न केले. खासदार संजय राऊत हे योग्य आहेत. तिकडे जायचे असल्यास राजीनामा द्यावा, मग तिकडे जा. त्यांनी पाटील नावाला कलंक लावला आहे. निधी मिळत नाही म्हणून गद्दारी केली, असे त्यांचे म्हणने असल्याचे नंदकुमार देशमुख म्हणाले.

MP Nagesh patil ashtikar
Ambadas Danve : राजकारण लयं वंगाळ, सर्वसामान्य कार्यकर्त्याला सगळं सोडून शेती करावीशी वाटते; अंबादास दानवे मनातले बोलले!

देशमुख यांच्यांशी उद्धव ठाकरे फोनद्वारे साधणार संवाद

ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी नागेश पाटील-आष्टीकर यांना फोन करणाऱ्या नंदकिशोर देशमुख यांना फोन केला आहे. यावेळी सावंत यांनी देशमुख यांना धीर दिला. त्यासोबतच उद्धव ठाकरे हे शिवसैनिक नंदकुमार देशमुख यांच्यासोबत संवाद साधणार असल्याचे समजते, त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

MP Nagesh patil ashtikar
BJP Vs MNS: 'मी फुसक्या अन् बिनविषारी सापांबद्दल...', भाजप आमदाराकडून पहिल्यांदाच राज ठाकरेंवर जिव्हारी लागणारा वार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com