DK Shivkumar: कर्नाटकात काँग्रेस सरकारमध्ये धुसफूस! मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्यावर स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, राजकारणाचा भाग...

Karnataka Government: कर्नाटकात काँग्रेस सरकारमध्ये सध्या धुसफूस सुरु असल्याचं चित्र आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर ज्यांना मंत्रीपदं मिळाली नाहीत त्या नाराज आमदारांनी आपले राजीनामे सादर केले.
DK Shivkumar
DK ShivkumarSarkarnama
Published on
Updated on

D K Shivkumar: कर्नाटकतील डी के शिवकुमार यांच्या सरकारनं नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या विस्तारामध्ये तब्बल २० मंत्र्यांना शपथ देण्यात आली. पण यामध्ये अनेक ज्येष्ठ आणि महत्वाकांक्षी आमदारांना स्थान मिळालं नाही. त्यामुळं अनेक जण नाराज झाले आणि त्यांनी चक्क आपल्या आमदारकीची राजीनामाच देऊन टाकला. यामुळं कर्नाटकात काँग्रेस सरकारमध्ये सध्या धुसफूस असल्याचं चित्र आहे.

DK Shivkumar
Shivsena News : उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या फुटीर खासदाराला शिवसैनिकाचा थेट फोन; 'साहेब, खरंच सांगतो, तुम्ही पुन्हा निवडून येणार नाहीत'

आपल्या सरकारमधील याच धुसफुसीच्या चर्चांवर आता थेट मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भाष्य केलं आहे. आमदारांच्या राजीनाम्याच्या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, "राजीनामे देणे हा राजकारणाचाच एक भाग आहे. ज्यांना राजीनामा द्यायचा आहे, त्यांना कोणीही रोखू शकत नाही. जर त्यांना पक्ष आणि राजकीय भवितव्य हवे असेल, तर त्यांनी पक्षातच राहिले पाहिजे. पक्ष असेल तरच बाकी सर्व गोष्टी साध्य होतात. धर्म सिंह आणि सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात जेव्हा मला मंत्रिपद मिळाले नाही, तेव्हा मीसुद्धा राजीनामा देऊ शकलो असतो. पण मी आणि जी. परमेश्वर यांनी संयम राखला ना? तसेच, मी सर्व मंत्र्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रांना तातडीने भेट देऊन दुष्काळ निवारण कार्याचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत"

शिवकुमार सरकारमध्ये नेमकं काय घडलं?

३ ऑगस्ट २०२६ रोजी शिवकुमार सरकारने पहिला मोठा कॅबिनेट विस्तार केला. सुमारे १९-२० नवीन मंत्र्यांना शपथ दिली. यामुळे मंत्रिमंडळ जवळपास पूर्ण क्षमतेवर (सुमारे ३३-३४ सदस्य) आले. या विस्तारामुळे काँग्रेस आमदारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. अनेक ज्येष्ठ नेते आणि आकांक्षी आमदार कॅबिनेटमध्ये समाविष्ट झाले नाहीत. त्यामुळे इंडीचे आमदार यशवंतराय गौडा व्ही. पाटील यांनी विधानसभेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यांचं म्हणणं आहे की, त्यांना मंत्रीपदाचं आश्वासन होतं, नाव यादीत होतं पण शेवटी वगळले गेलं. सागारचे आमदार बेलूर गोपालकृष्ण यांनीही राजीनामा देण्याची घोषणा केली. ते विधानसभा सदस्यपद आणि कॉर्पोरेशनचे पद दोन्ही पदांचा राजीनामा देणार आहेत.

DK Shivkumar
E20 Petrol: आता इथेनॉल पेटलं! "जनतेच्या तक्रारी सरकार ऐकून घेईना" केजरीवालांनी थेट पंतप्रधानांच्या घरासमोर ठिय्या; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

याशिवाय इतर काही आमदार ज्यामध्ये तन्वीर सैत, एच. के. पाटील, दिनेश गुंडू राव हे आमदार देखील नाराज आहेत. त्यांच्या समर्थकांनी निषेध आंदोलनेही केली आहेत. शिवकुमार यांनी “सर्वांना संधी मिळेल, संयम ठेवा” असं आवाहनही केलं आहे.

मे महिन्याच्या अखेरीस सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. २.५ वर्षांच्या रोटेशन सूत्रानुसार काँग्रेस हायकमांडनं त्यांना पद सोडण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर ३ जून २०२६ रोजी डीके शिवकुमार मुख्यमंत्री झाले. सुरुवातीला त्यांच्या कॅबिनेटमध्ये कमी मंत्री होते, त्यानंतर जूनमध्ये एक मंत्री रामलिंगा रेड्डी यांना मनासारखा विभाग न मिळाल्यानं ते नाराज झाले होते त्यामुळं त्यांनी मंत्रीपदाचा तात्पुरता राजीनामा दिला होता. पण नंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Congress Crisis
Congress
DK Shivakumar
Rammalinga Reddy, DK Shivakumar
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com