Dilip Walse Patil accompanies Sunetra Pawar to meet Amit Shah Sarkarnama
महाराष्ट्र

Dilip Walse Patil : सुनेत्रा पवार अमित शाहांना भेटणार, दिलीप वळसे पाटीलही सोबत, मोठा निर्णय होणार!

Sunetra Pawar to meet Amit Shah: उपमुख्यमंत्री,मुख्यमंत्री आज दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीमागेच कारण दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

Roshan More

BJP NCP Meeting: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये आहेत. त्या आज गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. ही भेट नेमकी का होत आहे, याची सविस्तर माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. सुनेत्रा पवारांसोबत ते देखील अमित शाह यांना भेटणार आहेत.

दिलीप वळसे पाटील यांनी फेसबूकवर पोस्ट करत सांगितले आहे की, 'महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या कांदा व साखर उद्योगासमोरील संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालले आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळाचा भाग म्हणून मी देखील उपस्थित राहणार आहे. राज्यातील शेतकरी आणि सहकार क्षेत्राच्या विविध प्रश्नांबाबत यावेळी सविस्तर भूमिका मांडली जाणार आहे.

वळसे पाटील पुढे म्हणाले की, 'सध्या कांदा उत्पादक शेतकरी दराच्या मोठ्या समस्येला सामोरे जात आहे. उत्पादन खर्च वाढत असताना कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांद्याला योग्य आणि हमीभाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस व सकारात्मक निर्णय घ्यावा, ही आमची प्रमुख मागणी असेल.'

'यंदाच्या प्रतिकूल हवामानामुळे उसाच्या उत्पादनात सुमारे १५ टक्क्यांनी घट झाली असून अनेक साखर कारखाने वेळेआधी बंद करावे लागले आहेत. यामुळे साखर उद्योगावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला असून शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची एफआरपी (FRP) थकली आहे.

या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्र आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही करण्यात येणार आहे.', असे देखील त्यांनी सांगितले आहे.

पुढे त्यांनी म्हटले की,'साखरेचा किमान विक्री दर (MSP) वाढवणे आणि इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध शिथिल करणे या महत्त्वाच्या मागण्या देखील केंद्र सरकारसमोर मांडल्या जाणार आहेत. दिल्लीतील या बैठकीतून महाराष्ट्रातील शेतकरी, ऊस उत्पादक आणि सहकार क्षेत्राला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ठाम आणि सकारात्मक भूमिका मांडणार आहोत.'

केंद्र सरकार दिलासा देणार?

महाराष्ट्राच्या मंत्र्यांचे शिष्टमंडळ आपल्या मागण्या अमित शाहांपुढे ठेवणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि कांदा, ऊसाच्या प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेईल,अशी शक्यता वर्तवील जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT